Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? भरपूर प्रोटीन असलेल्या स्वस्तात मस्त ८ व्हेज गोष्ट

कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? भरपूर प्रोटीन असलेल्या स्वस्तात मस्त ८ व्हेज गोष्ट

The 8 Best Protein Sources for Vegans and Vegetarians : प्रोटीन्स असलेले पदार्थ शरीराला मजबूत बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायेदशीर  ठरतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:35 AM2023-07-18T08:35:00+5:302023-07-18T13:42:30+5:30

The 8 Best Protein Sources for Vegans and Vegetarians : प्रोटीन्स असलेले पदार्थ शरीराला मजबूत बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायेदशीर  ठरतात.

The 8 Best Protein Sources for Vegans and Vegetarians : The best vegan protein sources | कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? भरपूर प्रोटीन असलेल्या स्वस्तात मस्त ८ व्हेज गोष्ट

कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? भरपूर प्रोटीन असलेल्या स्वस्तात मस्त ८ व्हेज गोष्ट

व्हेजिटेरिन लोकांमध्ये प्रोटीन्सची कमतरता जास्त प्रमाणात उद्भवते कारण ते नॉनव्हेज पदार्थांचा  आहारात समावेश करत नाहीत असा समज असतो.  शाकाहारी म्हणजेच व्हेगन पदार्थ खाऊनही तुम्ही शरीरातील प्रोटीन्सची कमतरता दूर करू शकता.  (The best vegan protein sources)अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की जर तुम्हाला मांस खायला आवडत नसेल तर सर्वोत्तम शाकाहारी गोष्टींच्या मदतीने तुम्ही आवश्यक पोषणाची कमतरता दूर करू शकता. प्रोटीन्स असलेले पदार्थ शरीराला मजबूत बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायेदशीर  ठरतात.  (Best Protein Sources for Vegans and Vegetarians)

डाळी

एका कप शिजवलेल्या डाळीमध्ये 18 ग्रॅम प्रथिने आढळतात. ज्याचा तुम्ही आहारात विविध प्रकारे समावेश करू शकता. यामध्ये फायबर देखील मुबलक प्रमाणात आढळते, जे हृदय निरोगी ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.

चिया सिड्स

एक चमचा तिया सिड्समध्ये जवळपास ३ ग्राम प्रोटीन्स असतात. यात प्रोटीन्स आणि ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. ओट्स किंवा स्मूदीमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता. 

पनीर

अर्धा कप पनीरमध्ये १४ ग्राम प्रोटीन असते. याव्यतिरिक्त यात कॅल्शियमचे प्रमाणही भरपूर असते. पनीरची भाजी किंवा सॅलेडच्या स्वरूपात तुम्ही पनीर खाऊ शकता. 

बीन्स

राजमा, छोले यांसारख्या बीन्समध्ये भरभरून प्रोटीन्स असतात. यात फायबर्सचे प्रमाणही जास्त असते. तुम्ही उकळून किंवा डाळ,  सॅलेडच्या स्वरुपात या बीयांचा समावेश करू शकता. 

हिरवे मटार

हिरवे मटार प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहेत. एक कप मटारमध्ये जवळपास ८ ग्राम प्रोटीन असते.  सूप, भाजी, सॅलेडच्या स्वरूपात तुम्ही मटार खाऊ शकता. 

मशरूम

मशरूमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. याचा आहारात समावेश करून तुम्ही रक्ताची कमतरता भरून काढू शकता. 

भोपळ्याच्या बीया

ड्रायफ्रुट्सप्रमाणे भोपळ्याच्या बिया देखील प्रथिने समृद्ध असतात. त्यात लोह, मॅग्नेशियमसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.

सोयाबीन

सोयाबीन तुमच्या दिवसभरातील प्रथिनांची गरज सहज पूर्ण करू शकते. सोया चंक्स, सॅलेड, भाज्या अशा अनेक प्रकारे तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.
 

Web Title: The 8 Best Protein Sources for Vegans and Vegetarians : The best vegan protein sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.