Join us  

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये घाला मध, पाहा कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2023 4:34 PM

The Benefits Of Black Coffee With Honey For Weight Loss कॉफी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यासह अतिरिक्त फॅट्स कमी करण्यास मदत होते.

लठ्ठपणाची समस्या सध्या जागतिक समस्या बनली आहे. याला कारणीभूत अनेक गोष्टी  आहेत. मुख्य म्हणजे बिघडलेली जीवनशैली आणि जंक फूडमुळे वजन झपाट्याने वाढते. वाढत्या वजनाने त्रस्त लोकं वजन कमी करण्यासाठी विविध टिप्स फॉलो करतात. वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम यात लोकं खूप पैसे खर्च करतात. अगदी कमी पैश्यात वजन कमी करायचं असेल तर, ब्लॅक कॉफी आणि मधाचा आहारात समावेश करा.

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, रिफ्रेश होण्यासाठी लोकं कॉफी पितात, पण त्यात साखर आणि दूध असल्यामुळे कॅलरीज वाढू शकते. वजन जर कमी करायचं असेल तर, ब्लॅक कॉफीमध्ये मध मिक्स करून प्या. ब्लॅक कॉफीमध्ये मध मिसळून प्यायल्याने वजन झरझर कमी होते(The Benefits Of Black Coffee With Honey For Weight Loss).

वजन कमी करण्यासाठी कॉफी कशी मदत करते?

कॉफी प्यायल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. कॉफीमधील कॅफिन न्यूरोट्रांसमीटरला चालना देतात. अनेक फॅट बर्निंग सप्लिमेंट्समध्येही कॅफिनचा वापर केला जातो. यासह मेटाबॉलिज्मची गती वाढते. ज्यामुळे वजन कमी होते.

२० मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायल्याने महिलेचा मृत्यू? पाणी पिण्याचा अतिरेकही ठरेल जीवघेणा

कॉफीमध्ये व्हिटॅमिन-B2, व्हिटॅमिन-B5, व्हिटॅमिन-B1, व्हिटॅमिन-B3, फोलेट, मॅंगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम आढळते. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात जे रोगांशी लढण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी मध कसे मदत करते?

मधामध्ये असलेले पोषक घटक अतिरिक्त फॅट्स कमी करण्यास मदत करतात. साखरेच्या तुलनेत मधामध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे कॉफीमध्ये साखरेऐवजी मध मिसळा. मध चयापचय वाढवते आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

रोज सकाळी उपाशी पोटी खा खोबऱ्याचे २ तुकडे, उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर - वजनही होईल कमी

कॉफीमध्ये मध मिसळून कधी प्यावे?

वजन कमी करताना कॉफीसोबत योग्य आहार आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफीमध्ये मध मिसळून प्या. याशिवाय आपण कधीही कॉफी पिऊ शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य