Join us  

कोण म्हणतं बारीक होण्यासाठी रात्रीचं जेवण सोडायचं? रात्रीच्या जेवणात ५ पदार्थ खा, मेंटेन व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:02 PM

The Best Dinner Foods for Weight Loss : रात्रीच्या जेवणासाठी हे पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळही लागणार  नाही.  १० ते १५ मिनिटांत जेवण तयार होईल.

भारतीय लोकांच्या खाण्यापिण्यात मिरची-मसालायुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असतात. अशा अनेक भाज्या, पदार्थ आहेत जे वजन कमी करण्यात कमालीचा परीणाम दाखवतात. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण सोडायचं का असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो तर काहीजण वजन कमी करण्यासाठी रात्रीचं कमी खातात. काही पदार्थ असे आहेत  जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण जितक्या लवकर रात्री जेवता येईल तितक्या लवकर जेवा. जेणेकरून खाल्लेल्या अन्नाचं पचन होईल आणि पोटही सुटणार नाही (How to loss belly fat) रात्रीच्या जेवणासाठी हे पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळही लागणार  नाही.  १० ते १५ मिनिटांत जेवण तयार होईल. ( The Best Dinner Foods for Weight Loss)

पनीर आणि मेथीची चपाती

रात्रीच्या जेवणात पनीर आणि मेथीची रोटी तुम्ही खाऊ शकता यामुळे जेवणाला चांगली चव येईल. पनीर आणि मेथीची  रोटी बनवताना पीठ मिळताना पनीर

आणि बारीक कापलेली मेथी घाला. दह्याबरोबर  हे खाल्ल्यास पचनसंस्था ही चांगली राहील.

बाजरीची  खिचडी

बाजरीत वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही खिचडी बनवू शकता. या खिचडीत डाळीसुद्धा घालता येतात. हा एक उत्तम वेटलॉसचा ऑपश्न आहे. (Weight Loss Dinner)  बाजरीची खिचडी खाल्ल्यानं वजन कमी होण्यासही मदत होते. 

उपमा

रात्रीच्या वेळी हलकं जेवण जेवल्यानं फॅट लॉस वेगानं होतं.  उपमा डिनरसाठी एक उत्तम पर्याय आहे. उपमा बनवण्यासाठी फक्त काही मिनिटं लागतात. या पदार्थाची चवही अप्रतिम असते. 

सोयाबीनची भाजी

सोयाबीन आरोग्यासाठी खूप चांगले असते. हे शरीराला उच्च प्रथिने प्रदान करतात जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असतात. रात्रीच्या जेवणात तुम्ही सोयापासून बनवलेले पदार्थही खाऊ शकता.

उकडलेल्या भाज्या, सॅलेड

रात्रीच्या जेवणात तुम्ही जितक्या कमीत कमी कॅलरीज घ्याल तितकाच चांगला परीणाम दिसून येईल. उकडलेली फरसबी, ब्रोक्रोली, शेंगा आणि बीट-गाजराचे सॅलेड याचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. जेणेकरून जास्तवेळ पोट भरलेलं राहील आणि लवकर भूक लागणार नाही. 

टॅग्स :हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स