''भागदौड़ भरी जिंदगी थकना मना है'', म्हणण्यापेक्षा ''भागदौड़ भरी जिंदगी मै फिट रेहना मुश्कील है'', हे वाक्य म्हणण्याची वेळ साधारण प्रत्येकावर आली आहे. कारण धावपळीच्या या जीवनात अनेकांना स्वतःसाठी वेळ काढायला जमत नाही. फिटनेसचे तीनतेरा वाजले आहेत. ज्यामुळे वजन तर वाढतेच, यासह इतर आजारही छळतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण स्किप करतात, किंवा दुपारच्या जेवणात काही बदल करतात. दिवसभर काम करण्याची उर्जा आपल्याला दुपारच्या जेवणातून मिळते.
दुपारच्या जेवणात प्रोटीन, कॅलरी, फायबर, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी असलेले अन्न घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. यासंदर्भात, डॉक्टर हब क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ अर्चना बत्रा यांनी वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात काय खावे, याबद्दल माहिती दिली आहे(The Best Lunch Foods and Ideas for Weight Loss).
वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात या गोष्टी खा
1. हिरव्या पालेभाज्या
भाजी आपल्या जेवणाचा मुख्य भाग आहे. अधिकाधिक भाज्या खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक उर्जा मिळते. दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि बी मुबलक प्रमाणात मिळते. यामुळे शरीराला पोषण मिळते, व अतिरिक्त चरबी देखील वाढत नाही.
पावसाळ्यात मासिक पाळीचे ४ दिवस शिक्षा वाटते, खाज-आग -इन्फेक्शन होते? डॉक्टर सांगतात उपाय..
2. डाळ
नियमित डाळी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. डाळींमध्ये प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि कार्बोहायड्रेट्स असते. आपण दुपारच्या जेवणात नियमित एक वाटी डाळ खाऊ शकतात. यामुळे पोट भरलेले राहते, व वजन कमी होण्यास मदत मिळते.
3. राजमा
भारतात राजमा फार फेमस आहे. अनेकांना राजम्याची भाजी खायला आवडते. राजम्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, सोडियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे अन्न पचण्यासही मदत मिळते. राजमा आपण कोशिंबीरमध्ये मिक्स करून खाऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?
4. चपाती किंवा ब्राऊन राईस
वेट लॉस करताना अनेक लोकं भात आणि चपाती खाणं टाळतात. परंतु, आपण दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस यासह चपाती देखील खाऊ शकता. एका चपातीमध्ये व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, लोह आणि पोटॅशियम आढळते. यासोबतच ब्राउन राइसमध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि फॉलिक अॅसिड असते. याचे सेवन केल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळते आणि पोटही दीर्घकाळ भरलेले राहते.
5. चणे
अनेकांना चण्याची भाजी खायला आवडते. आपण दुपारच्या जेवणात काबुली किंवा हरभरा चण्याची भाजी खाऊ शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन, लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. व कॅलरीज देखील वाढत नाही.
6. दही
आपण दुपारच्या जेवणात दही खाऊ शकता. पचण्यासाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण आहारात दह्याचा समावेश करू शकता. दुपारच्या जेवणात याचे सेवन केल्याने पोटही थंड राहते.