पोटाची चरबी जास्त असल्यामुळे बरेच लोक त्रस्त असतात. वाढलेलं वजन अनेक गंभीर आजाराचे कारण ठरू शकतो. लठ्ठपणामुळे आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येकाला आपण निरोगी, फिट राहावं असं वाटत असतं. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये, खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांचे वजन वाढते आणि बेली फॅट जास्त दिसायला लागतं. (Best Breakfast time for weight loss how to reduce bellyfat)
लोक वजन कमी करण्यासाठी चरबी घटवण्यासाठी योगा, व्यायाम, डाएटचा आपल्या फिटनेस रुटीनमध्ये समावेश करतात. नियमित योगाभ्यास केल्यानं वजन लवकर कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्यामते नाश्ता करण्याच्या वेळेत बदल करून तुम्ही ५ किलोपर्यंत वजन कमी करू शकता.
वजन कमी करण्यासाठी कोणत्यावेळी ब्रेकफास्ट करायचा?
आधी लोकांची सकाळ खूपच लवकर व्हायची. सुर्य मावळण्याच्या वेळेस लोक जेवून झोपण्याच्या प्रयत्नात असायचे. म्हणून सकाळी लवकर नाश्ता आणि रात्रीचं जेवण संध्याकाळी लवकर घेतलं जात होतं. रात्रीचं जेवण आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये खूप अंतर असायचं. तज्ज्ञांच्यामते १४ ते १६ तासाचं गॅप असल्यास लोक निरोगी आणि फिट राहू शकतात.
शरीर सडपातळ, पोट फार सुटलंय? रोज फक्त इतकी पाऊलं चाला; झरझर घटेल चरबी
बदलत्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्यापिण्याच्या वेळाही बिघडल्या आहेत. लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि अन्हेल्दी खात-पीत राहतात. तर सकाळी कॉलेज किंवा ऑफिसमुळे काहीही न खाता घराबाहेर पडतात किंवा दुपारीच काहीतरी खातात. अशा स्थितीत त्याच्या रात्रीचे जेवण आणि नाश्ता यात ठराविक अंतर नसते. त्यामुळे पोटाची चरबी वाढू लागते.
तज्ज्ञ लोकांना इंटरमिटेंट फास्टिंगचा सल्ला देतात. यात रात्रीच्या जेवणात आणि सकाळच्या नाश्त्यात अधिक गॅप ठेवावा लागत नाही. एक्सपर्ट्सच्या मते नाश्त्याची वेळ सकाळी ११ ची असावी. किंग्स कॉलेज लंडनचे जेनेटीक एपिडेमियोलॉजीचे प्रोफेसर सांगतात की वजन कमी करण्यासाठी ११ वाजेपर्यंत नाश्ता करायला हवा.एका रिसर्च रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे की रात्रीचं जेवण लवकर करून सकाळच्या नाश्त्यापर्यंत १४ तास काहीही खाऊ नका. जर तुम्ही रात्री ८ ते ९ या दरम्यान जेवणत असाल तर नाश्त्याची वेळ सकाळी ११ ची असावी.
पोट-कंबर खूप सुटले? मागचा भागही वाढलाय? घरीच रोज १० मिनिटं करा ५ व्यायाम, बघा फरक
जर तुम्ही सकाळी नाश्ता उशीरा केला तर संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत रात्रीचं जेवण करायला हवं. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यात मदत होते. आणि शरीर डिटॉक्स होते. रिपोर्ट्सनुसार सकाळी 7 ते 9 ही नाश्त्याची योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या वेळेत न्याहारी करावी. यानंतर काहीही खाऊ नये. मधेच भूक लागली तर हलका फुलका खाऊ शकता. सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत तुम्ही फळे, ज्यूस, मिल्कशेक असे काही पदार्थ खाऊ शकता.