Join us  

वजन वाढतं, पित्त सारखं खवळतं- रात्रीच्या जेवणाची वेळ चुकतेय? किती वाजता कराल रात्रीचं जेवण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2023 5:30 PM

The best time to eat dinner, according to health experts रात्री किती वाजता जेवलं तर वजनही कमी होईल आणि पित्तही कमी होईल?

शरीर फिट आणि तंदुरुस्त राहावे, असे प्रत्येकाला वाटते. परंतु, खराब लाईफस्टाईलमुळे अनेकांना जमत नाही. धावपळीच्या या जीवनात अनेकांना जेवण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. नाश्ता राजासारखं, दुपारचं जेवण प्रजेसारखं तर, रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं असं म्हटलं जातं. पण आपण या उलट करतो. ज्यामुळे आपण सतत आजारी पडत असतो. मुख्य म्हणजे वेळेवर न जेवल्यामुळे देखील त्रास होऊ शकतो.

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ कायला कॉप्प यांनी फॉर्च्यून वेल या वेबसाईटला माहिती देताना सांगितलं की, ''काही लोकं ७ नंतर जेवण करत नाहीत, तर काही रात्री उशिरा जेवण करतात. पण यातला कोणता गट बरोबर आहे? डिनर करण्यासाठी खास ठराविक वेळ नाही. पण तुम्ही डिनरमध्ये काय खाताय, याची काळजी घ्या. जर आपण वेट लॉस करत असाल तर, किती कॅलरीज इनटेक करत आहात हे पाहा''(The best time to eat dinner, according to health experts).

डिनर कधी करावे?

जर आपण दुपारचे जेवण २ च्या आधी किंवा साधारण १२ वाजता करत असाल तर, स्नॅक्स ३ ते ४च्या दरम्यान आणि डिनर ७ च्या दरम्यान करणे योग्य ठरू शकते. व जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा. झोपण्याच्या ३ तास आधी जेवा. व जेवल्यानंतर शतपावली करा.

रोज मूग डाळ खाण्याचे ५ फायदे, मुगाचं वरण म्हणजे भरपूर पोषण

रात्री उशिरा जेवण करणे टाळा

जेवल्यानंतर अनेकदा अॅसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते. बहुतांश वेळी दुपारचे जेवण वेळेवर न पचल्यामुळे असे होते. त्यामुळे दोन जेवणाच्यामध्ये अंतर हवाच. मुख्य म्हणजे मधुमेहीग्रस्त रुग्णांनी लवकर डिनर करावे, यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते, यासह आरोग्याला अनेक फायदे मिळतात. रात्री उशिरा जेवण केल्यामुळे शरीरात फॅट्स जमा होतात. ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. अशावेळी हेवी डिनर न करता, हलके पचणारे अन्न खावे.

सतत मैद्याचे पदार्थ खात असाल तर हे ५ आजार तुम्हाला झालेच म्हणून समजा..

निरोगी जीवनासाठी झोप आवश्यक

डॉक्टर अभिनव सिंग सांगतात, ''मेटाबॉलिज्म, रोगप्रतिकारक शक्ती, स्नायू बळकट, यासह मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी झोप महत्वाची. जेवल्यानंतर मोबाईल फोन टाळून झोप घेणे आवश्यक.''

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स