Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तुळशीची ४ पानं तुमचं वजन कमी करु शकतात! ‘हा’ खास उपाय करा- वजन घटवा चकटफू...

तुळशीची ४ पानं तुमचं वजन कमी करु शकतात! ‘हा’ खास उपाय करा- वजन घटवा चकटफू...

Starting Your Day With Tulsi Leaves May Do Wonders For Weight Loss, Here's How : वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा असा करा वापर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 06:38 PM2024-08-13T18:38:41+5:302024-08-13T19:58:21+5:30

Starting Your Day With Tulsi Leaves May Do Wonders For Weight Loss, Here's How : वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा असा करा वापर...

the best way to use tulsi for weight loss Starting Your Day With Tulsi Leaves May Do Wonders For Weight Loss, Here's How | तुळशीची ४ पानं तुमचं वजन कमी करु शकतात! ‘हा’ खास उपाय करा- वजन घटवा चकटफू...

तुळशीची ४ पानं तुमचं वजन कमी करु शकतात! ‘हा’ खास उपाय करा- वजन घटवा चकटफू...

सध्याच्या काळात वाढते वजन ही एक कॉमन समस्या झाली आहे. बदलत्या लाइफस्टाइलमुळे वजन वाढण्याच्या समस्येने अनेकजण हैराण आहेत. बैठे कामाचे स्वरूप, पुरेसा व्यायाम न करणे, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, आहारात जंक फुडचा भडीमार यांमुळे वजन लगेच वाढते. वजन वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जराही वजन वाढले की ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसतात(The best way to use tulsi for weight loss).

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिममध्ये तासंतास घाम गाळतात, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात.  परंतु अनेक वेळा नुसता व्यायाम केल्याने वजन कमी होत नाही कारण वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच योग्य डाएट घेणे आवश्यक असते. अनेक वेळा चुकीचे डाएट किंवा वर्कआऊट केल्याने वजन झपाट्याने वाढते आणि कमी होत नाही. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी घराच्या दारात असणाऱ्या तुळशीच्या पानांचा वापर करु शकतो. तुळशीमध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन सी फार मोठ्या प्रमाणांत असते. तुळशीचीच्या पानांचा रोज वापर केल्याने  शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि पचनसंस्था मजबूत होते. तुळशीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म अनेक आजारांपासून आपला बचाव करतात. वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर कसा करावा हे फिट क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ सुमन यांच्याकडून जाणून घेऊया(Starting Your Day With Tulsi Leaves May Do Wonders For Weight Loss, Here's How).

वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर कसा करावा ? 

१. तुळशीच्या पानांचे पाणी :- रोज तुळशीचे पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि चयापचय क्रियेचा वेग वाढतो. तुळशीच्या पानांचे पाणी रोज प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाते आणि अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. तुळशीचे पाणी बनवण्यासाठी १ ग्लास पाण्यात ५ ते ८ तुळशीची पाने टाका आणि उकळा. हे पाणी उकळवून अर्धे झाले की तयार पाणी गाळून प्यावे.

डाएट की व्यायाम वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचे? ‘हे’ करा- पोषणतज्ज्ञांचा सल्ला, वजन होते कमी...

२. तुळस आणि काळी मिरी :- वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुळस आणि काळी मिरी यांचा चहा देखील आपण पिऊ शकतो. हा चहा वजन कमी करण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. तुळस आणि काळीमिरीचा चहा हिवाळ्यात आणि  पावसाळ्यात होणाऱ्या  खोकला, सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळवून देण्यास उपयुक्त ठरतो. हा चहा बनवण्यासाठी १ ग्लास पाण्यात ५ ते ६ तुळशीची पाने, ३ ते ४ काळी मिरी आणि १/२ टेबलस्पून ओवा घालून उकळा. हे पाणी उकळवून अर्धे झाले की ते गाळून मग त्यात गूळ घालून हा चहा प्यावा.

३. तुळस आणि लिंबाचा रस :- वाढते वजन आणि शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण तुळस आणि लिंबू रसाचा देखील वापर करु शकता. लिंबाचा रस पचनशक्ती मजबूत करण्यासोबतच शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाणही कमी करते. तुळस आणि लिंबाचा रस करण्यासाठी ५ ते ६ तुळशीच्या पानांचा रस काढा. आता त्यात १ चमचा लिंबाचा रस घालून हा तयार रस प्यावा, असे केल्याने वजन झपाट्याने कमी होते.

५ पोटभरीचे पौष्टिक पर्याय, पोट तर भरेल - वजनही वाढणार नाही, भूक भूकही होत नाही...

४. तुळशीची पाने :- लठ्ठपणा कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी तुळशीची पाने आपण खाऊ शकता. रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्यासाठी पाने आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. तुळशीची पाने अशा प्रकारे रिकाम्या पोटी चावून खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासोबतच वजन कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा अशा प्रकारे आपण वापर करु शकतो. परंतु तुम्हाला कोणताही आजार किंवा ॲलर्जीची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुळशीचे पानं खावे.

Web Title: the best way to use tulsi for weight loss Starting Your Day With Tulsi Leaves May Do Wonders For Weight Loss, Here's How

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.