Join us  

प्रोटीन हवं ना ४ शाकाहारी गोष्टी खा, वाढेल काम करण्याची ऊर्जा! सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 4:57 PM

The most protein-giving substance | Sadhguru Jaggi Vasudev प्रोटीन हवं तर काय खायचं, कशी मिळेल एनर्जी? खा ४ गोष्टी

शरीर निरोगी राहावे यासाठी आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. शरीरात प्रथिने फार महत्वाची भूमिका बजावतात. यासाठी रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असावा असे तज्ज्ञ सांगतात. शरीरासाठी प्रथिने हा एक आवश्यक पौष्टिक घटक आहे. जे शरीराच्या उत्तम वाढीसाठी आणि चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहे. प्रथिने आपले केस, त्वचा, स्नायू आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात(The most protein-giving substance | Sadhguru Jaggi Vasudev).

शरीरातील प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होणे, अंगदुखी, थंडी जाणवणे, केस गळणे, त्वचेची चमक कमी होणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे अशा समस्या निदर्शनास येतात. परंतु, प्रोटीन नक्की कोणत्या पदार्थात आढळते? कोणते पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायदा होतो? याची माहिती सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''शाकाहारी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळते. डाळींमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. नियमित डाळी, कडधान्य खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.''

वयोगटानुसार प्रोटीन किती प्रमाणात खावे?

सर्वप्रथम, प्रत्येक वयोगटानुसार शरीराला किती प्रमाणात प्रोटीनची गरज आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रथिनांची गरज प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते.

- प्रौढ पुरुषांच्या शरीराला दररोजची प्रथिनांची आवश्यकता सुमारे ५० ते ६० ग्रॅम इतकी आहे.

- प्रौढ महिलांच्या शरीराला प्रथिनांची रोजची गरज सुमारे ४५-५५ ग्रॅम इतकी आहे.

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

- जर आपण व्यायाम किंवा इतर शारीरिक हालचाली करत असाल, तर याहून अधिक ग्रॅम आपण प्रोटीनचे सेवन करू शकता.

सद्गुरू सांगतात, प्रोटीन हवं तर खा..

कडधान्य

भारतात अनेक शतकांपासून कडधान्य खाण्यात येत आहे. आपल्या आहारात कडधान्य हवेच. यामधून शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. याव्यतिरिक्त जीवनसत्वे, खनिजं देखील मिळतात. नियमित कडधान्य खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची उर्जां, यासह वजन कमी होण्यास मदत मिळते. याचा हेल्थ सिस्टमवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

बिन्स

बिन्स ज्याला आपण फ्रेंच बिन्स देखील म्हणतो. यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. बिन्सचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नियमित बिन्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते, रक्तातील साखर कमी होते आणि आतड्यांतील निरोगी बॅक्टेरिया वाढतात. आपण बिन्स व्यतिरिक्त चणे, राजमा, सोयाबीन, शेंगदाणे खाऊ शकता.

आहारात रव्याचे पदार्थ नियमित खाण्याचे ४ फायदे- वजन कमी होते-ब्लडप्रेशरही राहते नियंत्रणात

हिरवे वाटाणे

हिरवे वाटाण्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. आपण हिरवे वाटाणे भाजी, सॅलॅड किंवा चाटमध्ये मिक्स करून खाऊ शकता. हिरव्या वाटाण्यामध्ये सामान्यतः २० ते २५ टक्के प्रथिने असते. एक कप हिरव्या वाटाण्यांमध्ये १० ग्रॅम प्रोटीन आढळते.

डाळ

डाळीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. डाळीमध्ये विविध प्रकार आहेत. आपण डाळीचे सेवन दररोज करू शकता. प्रथिनांच्या व्यतिरिक्त फायबर, लोह आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्व डाळीमध्ये आढळते. अर्धा कप शिजवलेल्या डाळीमध्ये १४० कॅलरीज आणि १२ ग्रॅम प्रथिने असते.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य