Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं तर भरपूर नाश्ता करा! नाश्त्याला बिनधास्त खा हे 5 पदार्थ.

वजन कमी करायचं तर भरपूर नाश्ता करा! नाश्त्याला बिनधास्त खा हे 5 पदार्थ.

पौष्टिकता, चव आणि वजन या तिन्ही गोष्टींचा विचार करता नाश्त्याला काय करावं हा तसा अवघड प्रश्न. पण तो सोपा करणारे पर्यायही आहेत. पोहे, उपमा, ओटस, दलिया, कॉर्नफ्लेक्स या पाच पदार्थातील गुणधर्मांमुळे वजन कमी करण्यासाठी ते परिणामकारक मानले जातात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 06:44 PM2021-08-07T18:44:46+5:302021-08-07T18:52:18+5:30

पौष्टिकता, चव आणि वजन या तिन्ही गोष्टींचा विचार करता नाश्त्याला काय करावं हा तसा अवघड प्रश्न. पण तो सोपा करणारे पर्यायही आहेत. पोहे, उपमा, ओटस, दलिया, कॉर्नफ्लेक्स या पाच पदार्थातील गुणधर्मांमुळे वजन कमी करण्यासाठी ते परिणामकारक मानले जातात.

These 5 healthy and tasty foods in breakfast helps to loose weight.. | वजन कमी करायचं तर भरपूर नाश्ता करा! नाश्त्याला बिनधास्त खा हे 5 पदार्थ.

वजन कमी करायचं तर भरपूर नाश्ता करा! नाश्त्याला बिनधास्त खा हे 5 पदार्थ.

Highlightsएक डिश पोहे आणि सोबत ताक किंवा दूध घेतल्यास चांगली ऊर्जा मिळते.दलियाला फिटनेस फूड असं म्हटलं जातं. कॉर्नफ्लेक्समधील घटकांमुळे चयापचयक्रिया सुधारते. छायाचित्रं- गुगल

वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला आपण काय खातो हे खूप महत्त्वाचं असतं. सकाळी जे खाणार ते पौष्टिक असलं पाहिजे शिवाय ते पोटभरीचंही असायला हवं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे खाणार त्यामुळे वजनही वाढायला नको. पौष्टिकता, चव आणि वजन या तिन्ही गोष्टींचा विचार करता नाश्त्याला काय करावं हा तसा अवघड प्रश्न. पण तो सोपा करणारे पर्यायही आहेत.

सकाळच्या नाश्त्याला काय?

छायाचित्र- गुगल

1. पोहे- नाश्त्याला पोहे खायाला सर्वांनाच आवडतं. पण वजन कमी करायचं असेल तर पोहे हा उत्तम पर्याय आहे. पोहे पचायला खूप कष्ट पडत नाही. पोहे पौष्टिक होण्यासाठी त्यात विविध भाज्या घालाव्यात. एक डिश पोहे आणि सोबत ताक किंवा दूध घेतल्यास चांगली ऊर्जा मिळते. या नाश्त्यानं वजन वाढत नाही.

छायाचित्र- गुगल

2. उपमा- रव्यचा उपमा हा नाश्त्याचा पौष्टिक पर्याय आहे. उपम्यामधेही विविध भाज्या घालून त्याची पौष्टिकता वाढवते. उपमा रव्याचा असतो. रव्यात भरपूर फायबर असतं.उपमा पचायलाही हलका असतो. उपमा खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही आणि एकदम उत्साही वाटतं.

छायाचित्र- गुगल

3. ओटस- ओटस हे झटपट होतात. हे बनवायला जितके सोपे तितकेच ते चविष्टही लागतात. ओटसमधे भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे ओटस खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. ओटस हदयरोग, मधुमेह यासारख्या आजारात फायदेशीर ठरतात. बध्दकोष्ठतेचा त्रासही ओटसमुळे कमी होतो.

छायाचित्र- गुगल

4. दलिया- दलियाला फिटनेस फूड असं म्हटलं जातं. नाश्त्याला दलिया खाल्ल्यानं पोट भरपूर वेळ भरल्यासारखं राहातं. दलियात फायबर मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे पोटाच्या समस्या बर्‍या होतात. नाश्त्याला दलिया खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.

छायाचित्र- गुगल

5. कॉर्नफ्लेक्स- कुरकुरीत कॉर्नफ्लेक्स खायला छान लागतात. कॉर्नफ्लेक्समधे लोह, अ, ब, क, ड आणि ई ही जीवनसत्त्वं असतात. तसेच त्यात थियामीन हे विकर असते. यामुळे चयापचयक्रिया सुधारते आणि ऊर्जाही वाढते. यात असलेल्या फायबरमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पोहे, उपमा, ओटस, दलिया, कॉर्नफ्लेक्स या पाच पदार्थातील गुणधर्मांमुळे वजन कमी करण्यासाठी ते परिणामकारक मानले जातात.

Web Title: These 5 healthy and tasty foods in breakfast helps to loose weight..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.