Join us  

म्हणून ५ प्रकारच्या व्यक्तींचं वजन कधीच कमी होत नाही? तुमचंही ‘तसं’च तर काही नाही? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 1:04 PM

Problems During Weight Loss: वजन कमी करण्यासाठी मनापासून प्रयत्न करताय, पण जमतच नाहीये? असा तुमचाही अनुभव असेल तर यामागचं नेमकं कारण काय हे एकदा आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या..

ठळक मुद्दे५ प्रकारच्या व्यक्तींचं वजन कमी होण्यासाठी भरपूर अडथळे येतात.. तुम्हीही त्या ५ पैकी एक नाही ना, हे एकदा तपासून बघा..

वाढतं वजन हा अनेकांसाठी डोकेदुखीचा प्रश्न. एकतर बैठ्या कामाचे वाढलेले तास आणि दुसरं म्हणजे व्यायामाचा अभाव या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम होतो, शिवाय अनेक जणांच्या बाबतीत त्याला जंकफूडचीही जोड मिळते. त्यामुळे वजनाचा काटा वाढतच जातो. पण काही लोक याबाबतीत खरोखरंच सतर्क असतात. वजन कमी (tips for weight loss) करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात. अगदी व्यायामापासून ते डाएटपर्यंत (diet and exercise) सगळं काही करतात, पण तरीही वजन कमी होतच नाही. असा अनुभव तुमचाही असेल तर आहारतज्ज्ञ लवलीन कौर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ एकदा बघायलाच पाहिजे. यात त्या असं सांगत आहेत की ५ प्रकारच्या व्यक्तींचं वजन कमी होण्यासाठी भरपूर अडथळे (Big obstacles in the journey of weight loss) येतात.. तुम्हीही त्या ५ पैकी एक नाही ना, हे एकदा तपासून बघा..

 

या ५ प्रकारच्या व्यक्तींना वजन कमी करणं ठरतं अवघड१. स्ट्रेसवजन कमी होतच नाही, म्हणून ज्या व्यक्ती खूप जास्त स्ट्रेस घेतात, त्यांचं वजन काही प्रमाणात तर कमी होतं, पण लगेच काही दिवसांत पुन्हा झपाट्याने वाढतं. खूप स्ट्रेस घेतल्याने कार्टिसॉल हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो. हा हार्मोन ग्लूकोज तयार होण्याची प्रक्रिया वाढवतो. यामुळे मग वजनही वाढतं. त्यामुळे सगळ्यात आधी वजन कमी होत नाही, म्हणून स्ट्रेस घेणं थांबवा. दुसरं म्हणजे वजनाचा ताण घेऊन जेवणातल्या कॅलरी खूप जास्त कमी करू नका. यामुळे शरीरातली उर्जा कमी होऊन, अशक्तपणा येतो. 

 

२. विकेंड फॉलो करणारेया दुसऱ्या प्रकारात येणारे लोक म्हणजे जे आठवडाभर व्यवस्थित डाएट करतात.. पण मग शेवटी कधीतरी त्यांचा स्वत:वरचा ताबा सुटतो किंवा मग खूप जास्त आग्रहाला ते बळी पडतात आणि मग डाएट किंवा व्यायाम, यात व्यत्यय येतो. या लोकांमध्ये लिप्टेन या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते आणि हंगर हार्मोन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यांना आहार किंवा व्यायाम यातला बॅलेन्स सांभाळणं अवघड होतं. हा बॅलेन्स सांभाळला तर निश्चितच वेटलाॅस होण्यास फायदा होईल.

 

३. दुसऱ्यांना दाखविण्यासाठी व्यायाम करणारेअशाही प्रकारचे लोक असतात. या लोकांचा व्यायाम, डाएट, जीम यासगळ्या गोष्टी केवळ दुसऱ्यांना दाखवण्यासाठी सुरु असतात. पण मनातून मात्र ते आपण जे काही करतो आहोत, त्याविषयी अजिबातच समाधानकारक नसतात. याच त्यांच्या मानसिकतेचा परिणाम त्यांच्या वजनावर होतो. आणि मग कितीही व्यायाम किंवा डाएटिंग केलं तरी त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाही.

 

४. दुसऱ्यांना फॉलो करणेअमूक एक उपाय करून आपल्या ओळखीच्या लाेकांचं वजन कमी झालं असेल, तर तोच फॉर्म्युला कोणताही विचार न करता जशाचतसा फॉलो करण्याची सवयही अनेकांना असते. यामुळे सुरुवातीला त्यांना वजन कमी झालेलं जाणवतं. पण नंतर मात्र त्यांची पचनक्रिया, मेटाबॉलिझम पुर्णपणे बिघडून जातात आणि या दोन्हींचा परिणाम मग वाढत्या वजनात होऊ लागतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता केवळ ऐकीव माहितीवर वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नये. 

 

५. उतावळे लोककाही लोकांना वजन कमी करण्याची खूप घाई असते, त्यांना अतिशय झटपट वेटलॉस हवा असतो. या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हार्मोन्सचे असंतुलन जाणवते आणि त्यामुळे मग वजन कमी होणे, त्यांच्यासाठी अवघड होऊन बसते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सअन्नव्यायाम