Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Natural pain killer: ५ नॅचरल पेन किलर, आपल्या स्वयंपाकघरातील औषधे; त्यासोबत आजारपणात डॉक्टरांचा सल्लाही हवाच..

Natural pain killer: ५ नॅचरल पेन किलर, आपल्या स्वयंपाकघरातील औषधे; त्यासोबत आजारपणात डॉक्टरांचा सल्लाही हवाच..

Health tips: दुखणं वाढलं तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.. पण सुरुवातीला एखादा दिवस या नॅचरल पेन किलरचा (natural pain killer in your kitchen) आधार घेतला तरी चालतो... दुखणं कमी होईल. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 06:33 PM2022-02-08T18:33:07+5:302022-02-08T18:34:33+5:30

Health tips: दुखणं वाढलं तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.. पण सुरुवातीला एखादा दिवस या नॅचरल पेन किलरचा (natural pain killer in your kitchen) आधार घेतला तरी चालतो... दुखणं कमी होईल. 

These are the natural pain killer in your kitchen, These are the benefits; In addition, in case of illness, a doctor's advice is also required. | Natural pain killer: ५ नॅचरल पेन किलर, आपल्या स्वयंपाकघरातील औषधे; त्यासोबत आजारपणात डॉक्टरांचा सल्लाही हवाच..

Natural pain killer: ५ नॅचरल पेन किलर, आपल्या स्वयंपाकघरातील औषधे; त्यासोबत आजारपणात डॉक्टरांचा सल्लाही हवाच..

Highlightsदुखण्याचं स्वरूप खूप तिव्र नसेल, तर सुरुवातीला एखादा दिवस पेन किलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय आपण करून बघू शकतो.

थोडंसं डोकं दुखलं.. अंगदुखी वाटली किंवा मग दातदुखी, घसादुखी असं काहीही झालं की अनेक लोक चटकन घरातली एखादी पेन किलर (pain killer tablets) किंवा ॲण्टीबायोटिक गोळी  (anti biotics) शोधून काढतात आणि पटकन घेऊनही टाकतात. ही गोळी घेण्याआधी ते डॉक्टरांचा सल्लाही विचारत नाहीत.. काही जण तर थेट मेडिकल दुकानदाराशी संपर्क साधून गोळ्या घेऊन मोकळे होतात. पण डॉक्टरांना न विचारता मनानेच गोळ्या घेणं अतिशय धोकादायक आहे.. त्यामुळेच तर मनानेच पेनकिलर घेण्यापेक्षा तुमच्या स्वयंपाक घरातल्याच पेन किलरचा (natural pain killer in your kitchen) उपयोग करून घ्या.. 

 

आपल्या स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा उपयोग आपण आपलं दुखणं थांबविण्यासाठी  करू शकतो. थोडंसं दुखलं की लगेच डॉक्टरांकडे जाणं कुणाच्याही जिवावर येतं.. म्हणूनच जर दुखण्याचं स्वरूप खूप तिव्र नसेल, तर सुरुवातीला एखादा दिवस पेन किलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय आपण करून बघू शकतो. त्यानंतरही जर दुखणं कमी झालं नाही, तर मात्र तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

१. हळद
हळदीमध्ये भरपूर प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते, तसेच हळदीमध्ये खूप जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. हे आपण जाणतोच. त्याचप्रमाणे हळदीमध्ये असणारे ॲण्टी ऑक्सिडंट्स दुखणं, सुज कमी करण्यासाठी मदत करतात. काही दुखापत होऊन सुज आली असल्यास, मुक्कामार लागला असल्यास तूप गरम करून त्यात हळद कालवावी आणि ती जखमेवर लावावी. यामुळे सुज उतरण्यास आणि वेदना कमी होण्यास मदत होते. 

 

२. लवंग
लवंगेमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी इंफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. सर्दी, घसादुखी, दातदुखी, खाेकला यासाठी भाजलेली लवंग खाणे फायद्याचे ठरते. 

 

३. अद्रक
अद्रकामध्ये ॲण्टी इंफ्लेमेटरी आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अद्रकाचा उपयोग होतो. सर्दी, खोकला, कफ या आजारांसाठी अद्रकाचा काढा करून प्यायल्याने फायदा होतो. आजारातून बरे होण्याची शक्ती वाढविण्यासाठी अद्रक मदत करते. त्यामुळे नियमितपणे अद्रकाचा चहा प्यायल्यानेही अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. 

 

४. तुळस 
सर्दी, खाेकला, घसादुखी यासाठी तुळस- अद्रक एकत्र करून त्याचा काढा प्यावा. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी तुळशीच्या पाण्यात भिजवलेल्या बिया खाणे उपयुक्त ठरते. मधमाशीचा दंश झाल्यास तुळशीच्या कुंडीतील माती त्या जागी लावल्याने वेदना कमी होतात. 

 

५. ओवा 
कफ कमी करण्यासाठी ओवा खावा. पोट दुखत असेल, फुगलं असेल किंवा अपचन झालं असेल तर थोडासा ओवा चावून चावून खावा आणि त्यावर गरम पाणी प्यावं. पोटदुखी लगेचच कमी होते. पित्ताचा त्रास होत असल्यास ओवा, काळेमीठ आणि सुंठ एकत्र करून खावी, असे सांगितले जाते. 

 

Web Title: These are the natural pain killer in your kitchen, These are the benefits; In addition, in case of illness, a doctor's advice is also required.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.