Join us  

अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांना चिअरफूल ठेवणारे हेल्दी ड्रिंक, हे ज्यूस नेमके आहे काय? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 6:20 PM

आहार आणि फिटनेस तज्ज्ञ सांगतात की आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी तसे पेय आणि पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट असायला हवेत. काही महत्त्वाची पेयं आहेत जी हेल्दी ड्रिंक्स म्हणून ओळखली जातात ती जर दिवसाच्या सुरुवातीला किंवा दिवसभरात कधीही घेतली तर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्याचा त्वचा, वजन यावरही चांगला परिणाम होतो.

ठळक मुद्देपचनासाठी आणि त्वचेसाठी अनुष्का सकाळी एल्डरफ्लॉवर टी घेते.सकाळी सकाळी ग्रीन टी पिला जात नसेल तर तापसी पन्नू प्रमाणे काकडी आणि ओव्याचा ज्यूस प्यायला हवा. हे ज्यूस बनवणं सोपं आहे.आलिया भट फिट राहाण्यासाठे कोकम ज्यूस आणि बीट रस पिते.छायाचित्रं:- गुगल

संपूर्ण दिवस उत्साहात जायला हवा, भराभरा कामं व्हायला हवी असंच आपल्याला उठल्यानंतर वाटतं. पण नुसतं वाटून काय उपयोग आहे. तसं प्रत्यक्षात घडून येण्यासाठी दिवसाची सुरुवात आपण कशी करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कायम कुतुहल वाटत असतं की बॉलिवूडमधील अभिनेत्री दिवस रात्र शुटिंग करतात, प्रवास करतात तरी त्या एवढ्या उत्साही कशा दिसतात? त्यांच्या चेहेर्‍यावर चमक कशी येते? ही तर मेकअपची कमाल नक्कीच नसते हे आपल्यालाही माहित असतं. या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर म्हणजे त्या आपल्या दिवसाचे सुरुवात हेल्दी ड्रिंकने करतात. अर्थात प्रत्येकीचं आवडतं हेल्दी ड्रिंक वेगळं आहे. पण ते कोणतं आणि ते घेतल्यानं काय होतं हे जाणून घेतल्यास हेल्दी ड्रिंकबद्दल आपल्यालाही कल्पना येईल आणि अपण कोणतं हेल्दी ड्रिंक घ्यायला हवं हे समजेल.

आहार आणि फिटनेस तज्ज्ञ सांगतात की आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी तसे पेय आणि पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट असायला हवेत. काही महत्त्वाची पेयं आहेत जी हेल्दी ड्रिंक्स म्हणून ओळखली जातात ती जर दिवसाच्या सुरुवातीला किंवा दिवसभरात कधीही घेतली तर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच त्याचा त्वचा, वजन यावरही चांगला परिणाम होतो.

छायाचित्र:- गुगल 

अनुष्का शर्माचं एल्डरफ्लॉवर टी आणि अल्काइन वॉटर

पचनासाठी आणि त्वचेसाठी अनुष्का सकाळी एल्डरफ्लॉवर टी घेते. एल्डरफ्लॉवर ही जंगली वनस्पती आहे. त्याच्या फुलांचा चहा हा एल्डरफ्लॉवर टी म्हणून ओळखला जातो. एल्डरफ्लॉवर टीचा उपयोग सर्दी तसेच मधुमेह यासारखे त्रास आणि आजार कमी करण्यासाठी होतो. शिवाय पचनक्रियाही या चहामुळे उत्तम होते.

हे हेल्दी ड्रिंक केवळ सकाळीच नाही तर दिवसातून तीन चार कप प्यायला हवा. या चहात क जीवनसत्त्वं आणि अँण्टिऑक्सिडण्टस भरपूर प्रमाणात असतात. तसेच अनुष्का शर्मा बर्‍याचदा सकाळी अल्कलाइन वॉटरही घेते. हे पेयं घरीही तयार करता येतं. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस घालावा. आणि हे पाणी प्यावं.

छायाचित्र:- गुगल 

सोनम कपूरचं बबल टी

 फॅशन आणि फिटनेस आयकॉन म्हणून ओळख असलेली सोनम कपूरने लॉकडाउन काळात स्वयंपाकात अनेक प्रयोग करुन बघितले आणि ते सोशल मीडियावरही टाकले. याच प्रयोगातून तिला तिचं रिफ्रेशिंग ड्रिंक सापडलं. ती सध्या रोज बबल टी पिते. यालाच पर्ल मिल्क टी असंही म्हटलं जातं. या चहात थोडे साबुदाणे घातले जातात. तसेच थोडा बर्फही घातला जातो. म्हणून या चहाला आइस्ड टी असंही म्हणतात. हा आइस्ड टी मूळचा तैवानचा आहे. हा चहा अजूनही भारतात खूपसा प्यायला जात नाही. मात्र तो आरोग्यदायी असल्यानं काही लोकांनी तो प्यायला सुरुवात केली आहे. सोनम कपूर त्यातलीच एक. हा चहा थकवा दूर करतो शिवाय ऊर्जाही देतो.

छायाचित्र:- गुगल 

तापसी पन्नूचं काकडीचं ज्यूस

सकाळी सकाळी ग्रीन टी पिला जात नसेल तर तापसी पन्नू प्रमाणे काकडी आणि ओव्याचा ज्यूस प्यायला हवा. हे ज्यूस बनवणं सोपं आहे. एका ज्युसरमधे काकडी, ओवा, सफरचंदाचे तुकडे घालावे आणि ते ब्लेण्ड करुन घ्यावे. यातला चोथा गाळून बाजूला करावा. आणि जेवढा रस आहे तो ग्लासमधे ओतून त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालावा. हे पेय शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास उपयुक्त मानलं जातं.

छायाचित्र:- गुगल 

जॅकलीन फर्नांडिसचं व्हीटग्रास शॉटस

त्वचा चमकदार करायची असेल तर जॅकलीन फर्नांडिससारखं व्हीटग्रास ज्यूस हवं. हे पेयं शरीरातील विषारी घटक काढून टाकतं. तसेच त्वचेवरील डाग, मुरुम पुटकुळ्या घालवण्यास मदत करतं. व्हीटग्रास म्हणजे गव्हाचं तृण. त्याच्यात अ क आणि ई जीवनसत्त्व असतं तसेच ते रक्तातील हिमोग्लोबीनही वाढवतं. व्हीटग्रास ज्यूस हे एक सुपरफूड मानलं जातं. हे व्हीटग्रास नियोजनपूर्वक घरातल्या घरात उगवून त्याचं ज्यूस करुन पिणं सोपं आहे. त्यासाठी गव्हाचे उगवलेले ताजे तृण घ्यावे ते पाण्यासोबत वाटून घ्यावे. गाळणीने गाळून ते प्यावं. हे रोज पिल्यानं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही राखलं जातं.

छायाचित्र:- गुगल 

मलायका अरोराचं ग्रीन स्मूदी

मलायका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम आणि आहार विहाराचा बारकाईनं विचार करते. फिट राहाण्यासाठे ती ग्रीन स्मूदी पिते. नारळ आणी सफरचंद यांचा उपयोग करुन तयार होणारी ही ग्रीन स्मूदी आपल्याला दिवसभर ताजतवानं आणि फिट ठेवते. हा स्वत: मलायकाचाही अनुभव आहे.

छायाचित्र:- गुगल 

आलिया भटचं कोकम ज्यूस आणि बीट रस

आलिया भट फिट राहाण्यासाठे कोकम ज्यूस आणि बीट रस पिते. कोकम ज्यूस वजन कमी करण्यास परिणामकारक आहे. तसेच बीटाचं ज्यूस हे शरीरातील क्षमता टिकवण्यासाठी उत्तम आहे. हे ज्यूस आलिया आलटून पालटून घेते. तसेच आलिया एक ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून ते डिटॉक्स ड्रिंक म्हणून घेते. शरीरातील विषारी घटक घालवण्यासोबतच हे डिटॉक्स ड्रिंक आपल्याला ताजंतवानं ठेवण्यासही उपयोगी पडतं.