संपूर्ण दिवस चांगला जाण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय करता हे फार महत्वाचं असतं. यावर तुमची दीनचर्या आणि मूड कसा असेल हे अवलंबून असतं. (10 Morning Habits That Help You Lose Weight) वजन कमी करण्याासाठी काही सोपे नियम लक्षात घ्यायला हवेत. ज्यामुळे तुमची वेट लॉस जर्नी अधिक सोपी होऊ शकते. (Morning Routine for weight loss) वेट लॉसमध्ये कठीण असं काहीही नाही. रोजच्या अनियमित सवयी बदलल्या तर शरीरात फरक आपोआप जाणवेल.
हायड्रेट राहा
तज्ज्ञ सांगतात की सकाळी उठल्यानंतर ब्रश करून एक ग्लास गरम पाणी प्या. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानं मेटाॉलिझ्म वेगानं होण्यास मदत होते. आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरते. पाण्यात लिंबाचा तुकडा किंव एप्पल सायडर व्हिनेगरचे काही थेंब घाला.
सकाळी व्यायाम करा
सकाळी व्यायाम केल्यास जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतात आणि तुमचं वजन वेगानं कमी होण्यास मदत होते. २० ते २५ मिनिटं व्यायाम केल्यानं तुम्ही मेंटेन दिसाल. व्यायाम केल्यानं इतरही फायदे मिळतात तुमचा मूड चांगला राहतो. सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करणं वजन कमी करण्यासाठी उत्तम मानलं जातं.
सकाळचा नाश्ता कधीच स्किप करू नका
सकाळचा नाश्ता हा दोन्हीवेळच्या जेवणापेक्षा जास्त महत्वाचा असतो. तज्ज्ञांचा देतात की नाश्ता नेहमी सकाळी ८ ते १० दरम्यान खावा. संतुलित नाश्ता करून तुम्ही दिवसभरासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळवू शकता आणि नंतर जास्त खाणे टाळू शकता. तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि सक्रिय चयापचय राखण्यासाठी तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्सचा समावेश करा.
प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश
प्रोटिन्सयुक्त खाद्य पदार्थ अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात. कारण प्रोटीन्स पचवण्यासाठी कार्बोहायड्रेट्सच्या तुलनेत अधिक उर्जेची आवश्यकता असते. लीन मीट, योगर्ट, पनीर आणि अंडी प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत आहेत.
मसालेदार अन्नपदार्थ
तज्ज्ञ मेटाबॉलिझ्म वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी सकाळच्या नाश्ताला लाल मिरची, आलं किंवा दालचिनी या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. हे मसाले थर्मोजेनिक असतात. ज्याचा अर्थ असा की यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि डायजेशन व्यवस्थित होते.
ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी
सकाळच्या रुटीनमध्ये ग्रीन टी किंवा ब्लॅक टी चा समावेश नक्की करा. यातील कॅफेन मेटाबॉलिझ्म वाढवण्यास मदत करते. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्याचा आरोग्यावर चांगला परीणाम होतो.