Join us  

भाताशिवाय जेवण पूर्णच होत नाही? भाताबद्दल माहित हव्यात अशा ५ गोष्टी, भात खाऊनही वाढणार नाही वजन....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 11:27 AM

Things You Should Know About Rice : भाताबद्दल आपल्या मनात असणारे गैरसमज दूर व्हावेत यासाठी...

ठळक मुद्देतांदूळ पाण्यात भिजत ठेवणे, धुणे आणि मग शिजवणे असे केल्यास अर्सेनिक निघून जाण्यास मदत होते.वजन कमी करायचं म्हणून किंवा मधुमेह असल्याने अनेक जण भात पूर्ण बंद करतात, पण तसे योग्य नाही.

भात म्हणजे अनेकांचा वीक पॉईंट असतो. भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही असं अनेक जण म्हणतात. कित्येक जण तर भातावरच जेवण करतात. दुपारच्या जेवणात पोळी-भाजी नसल्याने कित्येक जण रात्रीचे जेवण गरम भातावरच करतात. भाताने वजन वाढते, भातामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे भात खाऊ नये किंवा खूप कमी प्रमाणात खावा असे अनेक जण म्हणतात. पण खरंच असं असतं का? भाताबद्दल आपल्या मनात बरेच गैरसमज असतात. ते दूर करण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी भाताविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगतात. पाहूयात भाताबद्दलच्या या गोष्टी (Things You Should Know About Rice)...

१. भात हा गोड, वजनाने हलका आणि पचायला सोपा असतो. त्यामुळे इतर धान्यांपेक्षा तो लवकर पचतो. म्हणूनच आजारी व्यक्तीला शक्यतो भात खाण्याचा सल्ला दिला जातो. 

(Image : Google)

२. शरीराचे पोषण करणारे गुणधर्म भातात असल्याने भात आहारात असायला हवा असे म्हटले जाते. तांदळात ओजस गुण असल्याने तब्येत चांगली राहण्यासाठी आपल्या आहारात भाताचा अवश्य समावेश असायला हवा. 

३. जो तांदूळ ६० दिवस घेऊन पिकवला जातो तो भातासाठी सर्वात उत्तम तांदूळ असतो असे म्हणतात. त्यामुळे आपण खात असलेला तांदूळ शक्यतो किमान वर्षभर जुना असायला हवा. तांदूळ जितका जुना तितका पचायला हलका होतो.

४. जास्त जुना तांदूळ हा नवीन तांदूळापेक्षा केव्हाही जास्त चांगला. कारण जुन्या तांदळात जास्त पोषणमूल्य असतात असे म्हटले जाते. भातात अर्सेनिक नावाचा घटक असतो. त्यामुळे तांदूळ पाण्यात भिजत ठेवणे, धुणे आणि मग शिजवणे असे केल्यास अर्सेनिक निघून जाण्यास मदत होते.

५. केरळमध्ये प्रसिद्ध असणारा नवरा नावाचा तांदूळ आरोग्यासाठी सर्वात चांगला मानला जातो. वजन कमी करण्याबरोबरच आरोग्याच्या विविध समस्यांसाठी हा तांदूळ उपयुक्त असतो. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नलाइफस्टाइलआहार योजना