Join us  

बिनसाखरेचा चहा पिण्यात मजा नाही? हे घ्या साखरेऐवजी ३ पर्याय, प्या बिंधास्त गोड चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2022 7:35 PM

Health tips: वजन कमी करण्यासाठी काहीही करेल.. पण तेवढा बिनसाखरेचा चहा मात्र प्यायला सांगू नका.. असं खूप जणांचं असतं.. वजनही कमी करायचंय (weight loss) आणि चहापण गोड हवा... तर मग साखरेऐवजी वापरा हे ३ पर्याय (sweet tea instead of sugar)..

ठळक मुद्देजेव्हा चहातल्या साखरेवर गदा येते, तेव्हा मात्र नको ते डाएट असं होऊन जातं. म्हणूनच मग साखरेऐवजी वापरा हे ३ पर्याय

ज्यांना वजन कमी करायचं असतं त्यांना काही पदार्थ त्यांच्या डाएटमधून अगदी तात्काळ बंद करायला सांगितले जातात.. त्यात सगळ्यात प्रामुख्याने येणारं एक नाव म्हणजे साखर.. आता साखर बंद करायची म्हणजे आपण गोड पदार्थ खाणं टाळू शकतो.. कारण रोजच काय आपण गोड खात नाही....त्यामुळे त्याचा खूप काही ताण येत नाही.. पण जेव्हा चहातल्या साखरेवर गदा येते, तेव्हा मात्र नको ते डाएट (diet) असं होऊन जातं. वजन वाढलं तरी चालेल पण चहा मात्र गोडच (how to make sweet tea instead of sugar) हवा, अशा पॉईंटला आपण येऊन ठेपतो...

 

पण चहामध्ये साखर न टाकताही तो गोड करता येतो.. त्यासाठी वेगवेगळे पर्याय नक्कीच उपलब्ध आहेत..  हे पर्याय जर वापरले तर चहाही गोड प्यायला मिळेल आणि वजन वाढायची भीतीही उरणार नाही. यापैकी सगळ्यात प्रसिद्ध आणि बहुतेक सर्वांना माहिती असणारा पदार्थ म्हणजे गूळ. गूळाचा चहा तर आता अगदी प्रत्येक शहरात ठिकठिकाणी मिळतो. हा चहा अतिशय आरोग्यदायी असतो असं मानलं जातं. यामुळे वजन वाढायची भीती तर नसतेच, पण हा चहा प्यायल्यामुळे गुळामध्ये असणाऱ्या अनेक पौष्टिक घटकांचा लाभ तुमच्या शरीराला होतो. म्हणूनच तर साखरेऐवजी गुळाचा चहा पिणं कधीही चांगलं..

 

साखरेऐवजी तुम्ही चहामध्ये मध टाकण्याचा विचारही नक्कीच करू शकता. मध टाकून चहा प्यायचा असेल, तर साखर टाकतो त्याप्रमाणे चहा उकळत असतानाच त्यात मध टाकू नये. चहा कपामध्ये ओतल्यानंतर वरून त्यात मध घाला. तो चहा हलवून घ्या आणि प्या.. साखरेपेक्षा मधाचा चहा कधीही चांगलाच..

 

तिसरा पर्याय म्हणजे मणूके. मणुके टाकून केलेला चहा वरील दोन्ही चहाच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात केला जातो. पण हा हेल्थ फ्रेंडली चहा करायला हरकत नाही. हा चहा करण्यासाठी मणुक्याचे बारिक तुकडे करावेत. ते दूध किंवा पाण्यात उकळून घ्यावेत. नंतर त्या पाण्यात चहा पावडर, दूध टाकावे. हा चहा कमी गोड होतो, पण बिनसाखरेच्या कडवट चहापेक्षा चवीला कधीही उत्तमच असतो. 

 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स