सध्या जगभरातील लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. काहीजण चालायला जातात तर काहीजण व्यायाम करून वजन कमी करतात. बाजारात वजन कमी करण्यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत पण त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. शरीरातील चरबी कमी करण्यााठी व्यायाम आणि फिजिकल एक्टिव्हीटीजचा चांगला फायदा होतो. (5 foods keep in fridge that help to reduce weight eat veggie fruit dark chocolate)
वेबएमडीच्या रिपोर्टनुसार फक्त स्वादीष्ट पदार्थ कमी खाऊन वजन कमी करता येतं असं नाही. तुम्ही रोज किती खाता आणि काय खाता याची सुद्धा नोंद ठेवायला हवी. आहारात अशा पदार्थांचा समावेश करा ज्यात कॅलरीज कमी असतील. आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होईल. कोणते पदार्थ खाल्ल्यानं मेटाबॉलिझ्म वाढतो. बराचवेळ भूकही लागत आणि एनर्जी मिळते. ते पाहूया.
भाज्या
तुम्ही फ्रिजच्या ड्रॉवरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ठेवू शकता. यामध्ये हिरव्या पालेभाज्या, बीन्स, मशरूम इत्यादींचा समावेश करा. कोणत्याही प्रकारचे इन्स्टंट फूड बनवण्यात हे तुम्हाला सहज मदत करेल आणि तुम्ही सॅलेड वगैरे बनवून तुमची भूक भागवू शकाल. यामध्ये फायबर, पोषण, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स असून कॅलरीज कमी असतात, जे वजन कमी करण्यासाठी काम करू शकतात.
डार्क चॉकलेट्स
जर तुम्ही चॉकलेट प्रेमी असाल तर संशोधनात असे आढळून आले आहे की डार्क चॉकलेटचे सेवन करूनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. हे दुधाच्या चॉकलेटच्या तुलनेत 15 टक्क्यांनी भूक कमी करते आणि तुम्ही जास्त वेळ न खाल्ल्याशिवाय राहू शकता. मात्र, जास्त प्रमाणात चॉकलेट खाणे टाळा.
फळे
फ्रिजमध्ये ताजी फळं आणि बेरीज असतील याची खात्री करा. यामुळे फूड क्रेव्हीग्स कमी होण्यास मदत होते. तुम्ही अयोग्य आणि साखरयुक्त पदार्थ खाणं टाळल्यास चांगला परीणाम दिसून येईल. जेव्हा तुम्हाला भूक लागेल किंवा गोड खावेसे वाटेल तेव्हा इतर गोड पदार्थ खाण्यापेक्षा फळं खा.
दही
दही एक सुपर फूड आहे. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. काहीजण सकाळची सुरूवात दह्यानं करतात तर काहीजण दह्यात बेरीज मिसळून खातात. यामुळे वजन कमी होणं जास्त सोपं होतं. फ्रिजमध्ये नेहमी दही ठेवायलाच हवं. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पनीर
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कच्चे पनार खा. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल, तसेच तुमच्या वाढत्या वजनावर ते प्रभावी ठरेल. पनीर तुम्ही भाजी किंवा सॅण्डविचमध्येही वापरु शकता. पनीर सॅलेडमध्ये मिसळून खाल्ल्यावर त्यात असलेल्या पोषक तत्वांचा फायदा तुम्हाला मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सॅलडमध्ये पनीर मिसळून सेवन करणे फायदेशीर ठरेल.