वाढलेलं वजन कमी करणं हा जसा मोठा टास्क असतो त्याचप्रमाणे कमी असलेलं वजन वाढवणं हेही अनेकींपुढे एक महत्त्वाचं आव्हान असतं. बरेचदा वजन वाढलेलं असल्याने ते कमी करण्यासाठी काय उपाय करायचे याबाबत आपण चर्चा करतो पण वजन वाढवण्यासाठी नेमकं काय करावं यासाठी काय करावं यासाठी मात्र फारसे सल्ले मिळत नाहीत. पण प्रमाणापेक्षा बारीक असणं अनेकदा आपल्याला सगळ्यांमध्ये आपण वेगळे असल्याचे दाखवून देतात. इतकंच नाही तर खूप बारीक असलो तर अनेकदा आपल्याला सगळ्यांचे टोमणेही ऐकून घ्यावे लागतात. पण जाडी वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं याविषयी (Tips For How To Gain Weight)...
१. कॅलरी इनटेक वाढवणे
वजन वाढण्यासाठी आपल्या शरीराला भरपूर कॅलरीची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही जास्त बारीक असाल तर आहारात जास्त प्रमाणात कॅलरीज घ्यायला हव्यात. जाड व्हायचं असेल तर नेहमीपेक्षा आहारात ५०० ग्रॅम जास्त कॅलरीज घ्यायला हव्या. मात्र कॅलरीज जास्त घ्यायच्या असल्या तरी त्या पोषक आहारातून मिळतील याची काळजी घ्यायला हवी. यासाठी तुम्ही आहारात प्रोटीन पावडरचाही अवश्य समावेश करु शकता. तसेच यासाठी तुम्ही आहारतज्ज्ञांचाही सल्ला घ्यायला हवा.
२. आहारातील फॅटसचे प्रमाण वाढवणे
दाणे, बिया, पिनट बटर, ऑलिव्ह अशा फॅटस असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश वाढवा. याशिवाय अव्होकॅडो या फळाचाही आहारात समावेश करा. तसेच सॅलेड आणि भाज्यांमध्येही आवर्जून ऑलिव्ह ऑईल घाला.
३. प्रोटीन इनटेक वाढवा
तुम्हाला आरोग्यदायीपणे वजन वाढवायचे असेल तर प्रोटीन हा सर्वात उत्तम पर्याय आहे. शरीराची ताकद भरुन येण्यासाठी आणि हाडं चांगली राहण्यासाठी प्रोटीन खाणे अतिशय फायदेशीर असते. अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांसाहार, डाळी यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. याशिवाय प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक अशा सप्लिमेंटमधूनही प्रोटीन मिळते.
४. तेल किंवा बटरचा वापर वाढवणे
तेल आणि तूप किंवा बटर आहारात जास्त प्रमाणात घेतले तर आपले वजन वाढते हे आपल्याला माहित असते. यामुळे कॅलरीज वाढत असल्याने प्रत्येक मिलमध्ये तेल किंवा बटरचा वापर केल्यास १०० कॅलरीज मिळतात. म्हणून ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी आहारात जास्त प्रमाणात तेल किंवा बटरचा वापर करावा.