Join us  

महिन्याभरात वजन कमी करण्यासाठी १ सोपा उपाय, सुटलेलं पोट कमी होईल- स्लिम मेंटेन दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 10:45 AM

Tips For successful weight loss : एका आठवड्यात ५ किलो वजन कमी करण्याची प्रयत्न करू नये. वेगाने वजन कमी केल्यामुळे मांसपेशीचे नुकसान होते आणि पोषक तत्वांची कमतरता भासू शकते.

वजन वाढणं ही एक गंभीर समस्या आहे. कारण ओव्हर वेटमुळे कॅन्सर, डायबिटीस यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. (How to Loss Weight Faster) वजन कमी करण्यासाठी लोक बरेच डाएट आणि वर्कआऊट करून थकला असाल तर वजन कमी करण्यासाठी काही तुम्ही काही सोपे उपाय ट्राय करून पाहू शकता. ज्यामुळे महिनाभरात तुमचं वजन कमी झालेलं दिसेल. डायटिशियन शिखा अग्रवाल यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे जास्त मेहनत न घेता तुमचं वजन कमी होऊ शकतं. (Easy Ways to Lose Weight Naturally)

एका आठवड्यात ५ किलो वजन कसे कमी होईल? 

शिखा यांच्यामते जर तुम्हाला एका आठवड्यात  ५ किलो म्हणजे ११ पाऊंड वजन कमी करायचे असेल तर  ३८,५०० कॅलरीज बर्न कराव्या लागतील. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला रोज ५,५०० कॅलरीज बर्न कराव्या लागतील.

मनगट बारीक पण दंड जाडजूड झाले? २ व्यायाम-स्लिम होतील दंड, स्लिव्हलेस ड्रेसमध्ये सुंदर दिसाल

 प्रत्येक पुरूषाला रोज जवळपास २५००  ते ३००० कॅलरीज तर महिलांना प्रतिदिवशी २००० ते २५०० कॅलरीजची आवश्यकता असते. तुम्हाला ५,५०० कॅलरीज कमी कराव्या लागतील. या पद्धतीने तुम्ही रोज  जवळपास ५०० ते १००० कॅलरीज बर्न करू शकता. 

एका आठवड्यात ५ किलो  कमी करणं गरजेचं आहे का?

एका आठवड्यात ५ किलो वजन कमी करण्याची प्रयत्न करू नये. वेगाने वजन कमी केल्यामुळे मांसपेशीचे नुकसान होते आणि पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. याशिवाय ओव्हलऑल आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होतो.

गोष्टी विसरायला होतात, डोकं चालत नाही? रोज खा ५ पदार्थ, स्मरणशक्ती वाढेल-डोकं चालेल सुसाट

वजन वाढवण्यासाठी तुम्हाला जितका वेळ लागतो तितकंच ते कमी करण्यासाठीसुद्धा लागतो. जर तुम्ही  कमी वेळात भराभर वजन कमी केलं तर ते पुन्हा वाढण्याची शक्यता असते. वय, लिंग, खाण्यापिण्याच्या सवयी यावर तुम्ही किती वेळात वजन कमी करू शकाल ते अवलंबून असतं.

 

वेगानं वजन कमी करण्याचे दुष्परिणाम

वेगानं वजन कमी केल्यास आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होतो. शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते याशिवाय मांसपेशी कमकुवत होतात.  तुलनेने जे लोक हळूहळू वजन कमी करतात. त्यांच्या मांसपेशीचे नुकसान होत नाही. चयापचन चांगले राहते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य