Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोण म्हणतं भात-चपाती खाल्ल्याने वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर जेवून बारीक होण्याचं सिक्रेट

कोण म्हणतं भात-चपाती खाल्ल्याने वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर जेवून बारीक होण्याचं सिक्रेट

Roti or Rice What's Best For Weight Loss (Vajan kami karnaysathi diet sanga) : भाताबरोबर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हा एक अल्ट्रा-लो फॅट, लो कॅलरीज आहार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 10:58 AM2024-01-01T10:58:06+5:302024-01-01T11:11:30+5:30

Roti or Rice What's Best For Weight Loss (Vajan kami karnaysathi diet sanga) : भाताबरोबर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हा एक अल्ट्रा-लो फॅट, लो कॅलरीज आहार आहे.

Tips To Eat White Rice and Chapati and Still Lose Weight by Experts 5 Thing to Remember While Eating Rice | कोण म्हणतं भात-चपाती खाल्ल्याने वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर जेवून बारीक होण्याचं सिक्रेट

कोण म्हणतं भात-चपाती खाल्ल्याने वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर जेवून बारीक होण्याचं सिक्रेट

वजन कमी करण्यासाठी लोक आपल्या खाण्यापिण्यात बदल करतात कोणी भात खाणं सोडतं. (Weight Loss Diet Tips) तर कोणी चपाती खात नाही. वजन कमी करण्यासाठी भात, चपाती, ओट्स यापैकी काय खाणं सर्वात उत्तम ठरतं.  याबाबत इंस्टाग्रामवर मायहेल्थीबडी पेजवर हेल्थ एक्सपर्ट आशिष ग्रेवाल यांनी अधिक माहिती दिली आहे. (Rice or Roti Which is Better For Weight Loss) काही लोक रात्री चपाती खाणं टाळतात आणि आहारात ओट्सचा समावेश करतात. वजन कमी करण्याासठी ओट्सचा सर्वात उत्तम पर्याय आहे. (Roti  or Rice What's Best For Weight Loss)

भाताचा आहारात समावेश का करावा? (How to Eat White Rice For Weight Loss)

हेल्दी फाय मी च्या अहवालानुसार संधोधक सांगतात, ''तांदूळ हे मुख्य अन्न असून तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळात खाऊ शकता. भाताबरोबर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हे एक अल्ट्रा-लो फॅट, लो कॅलरीज आहार आहे. ब्राऊन राईस खाल्ल्याने वजन कमी करण्यात मदत होते. आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. ब्राऊन राईस ४ ग्रॅम फायबर देते. फायबर्सयुक्त पदार्थाचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करणं सोपं होऊ शकते.''

आशिष ग्रेवाल सांगतात, ''ओट्स, चपाती आणि भातातील कॅलरीजबाबत  बोलायचं झालं तर १०० ग्रॅम शिजवलेल्या ओट्समध्ये जवळपास  ११७ कॅलरीज असतात. तर १०० ग्राम शिजवलेल्या भातात १०२ कॅलरीज असतात. तर ४० ग्रामच्या चपातीत जवळपास १०७ कॅलरीज असतात. म्हणूनच हे तिन्ही पर्याय वजन कमी करण्याासाठी उत्तम आहे. ग्लुटेनयुक्त पदार्थांची  एलर्जी असेल तर तुम्ही चपाती खाणं स्किप करू शकता.''

वजन वाढू नये यासाठी या गोष्टींची काळजी घ्या. (Tips For Fast Weight Loss at Home)

१) काही तेलकट, तुपकट खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.  त्याऐवजी तुम्ही  भात, चपाती कोणताही पर्याय निवडू शकता. 

पोट कमी करायचंय? नवीन वर्षाच्या सुरूवातीपासूनच घ्या 'हा' एकदम साधा आहार-स्लिम होईल पोट

२) तांदूळ, चपाती, दूध, चहा, केळी यांसारख्या पदार्थांच्या आपल्या आहारात समावेश करा. 

३) वजन कमी करण्यासाठी ज्या काही कॅलरीज खाण्याच्या माध्यमातून आहारात घेत आहात ते कमी करण्याची आवश्यकता असते. कमी कॅलरीज आणि जास्त मेहनत केल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत होते. 

४) डाएट प्लॅन हा कधीच तुमच्यासाठी शिक्षा असू नये. तुम्ही आपल्या आवडत्या हेल्दी खाद्यपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. पोषक तत्वांचा आहारात समावेश करा. 

रात्री पोटभर भात खाल्ला तरी पोट सुटणार नाही, भातासोबत खा ‘हा’ पदार्थ, पारंपरिक सोपा उपाय

५) वजन कमी करण्यासाठी तुम्ही आवडते पदार्थ चपाती, भात खाणं सोडण्याची काही  गरज नाही. आपल्या आहारततज्ज्ञांशी बोलून योग्य प्रमाणात या पदार्थांचे सेवन करा. 

Web Title: Tips To Eat White Rice and Chapati and Still Lose Weight by Experts 5 Thing to Remember While Eating Rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.