Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन वाढण्याच्या भीतीने मन मारून भात खाणं टाळताय? असं करू नका, भात खाऊनही होईल वजन कमी, पण..

वजन वाढण्याच्या भीतीने मन मारून भात खाणं टाळताय? असं करू नका, भात खाऊनही होईल वजन कमी, पण..

Tips to eat white rice and still lose weight : वजन कमी करताना भात सोडू नका, तज्ज्ञांनी भात कधी, कसा आणि किती खावा याची माहिती दिली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 05:21 PM2023-12-05T17:21:12+5:302023-12-05T17:21:55+5:30

Tips to eat white rice and still lose weight : वजन कमी करताना भात सोडू नका, तज्ज्ञांनी भात कधी, कसा आणि किती खावा याची माहिती दिली..

Tips to eat white rice and still lose weight | वजन वाढण्याच्या भीतीने मन मारून भात खाणं टाळताय? असं करू नका, भात खाऊनही होईल वजन कमी, पण..

वजन वाढण्याच्या भीतीने मन मारून भात खाणं टाळताय? असं करू नका, भात खाऊनही होईल वजन कमी, पण..

वजन कमी (Weight Loss) करताना भात सोडावा का? असा प्रश्न अनेकांना पडतो. मुख्य म्हणजे वेट लॉस करताना भात आणि चपाती न खाण्याचे सल्ले अनेकांनी दिला असेल. पण भात (Rice for Weight Loss) आणि वजनाचा संबंध काय? भाताचे तयार केलेले पदार्थ भारतीयांना प्रचंड आवडतात. शिवाय डाळ - भाताला कम्फर्ट मिल मानले जाते.

अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जमत नाही. पण वजन कमी करताना आहारातून भात वगळणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. पण आपण भात खाऊनही वजन कमी करू शकता (Fitness). पण भात खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?, भात खाण्याची योग्य पद्धत कोणती?, वेट लॉसदरम्यान भात कधी आणि केव्हा खावा? याची माहिती पोषणतज्ज्ञ सिमरन कौर यांनी दिली आहे(Tips to eat white rice and still lose weight).

वजन कमी करताना कशापद्धतीने भात खावा?

- पोषणतज्ज्ञ सिमरन सांगतात, 'वजन कमी करताना आपण भात खाऊ शकता. मात्र, भात खाताना पोर्शन कण्ट्रोलकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

- भातामध्ये कॅलरीज, स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपल्या खाण्याच्या दुसऱ्या पदार्थांमधून कार्बोहायड्रेटचे सेवन करू नये. शिवाय अधिक प्रमाणात भात खाणं टाळावे.

बॉबी देओल सांगतो ४ महिने साखर सोडली आणि.. खरंच साखर सोडल्यानं वजन पटकन कमी होतं?

- आपण कधी आणि किती प्रमाणात भात खात आहात याकडे लक्ष द्यायला हवे. वजन कमी करताना दिवसातून एकदाच एक वाटी भात खा. शिवाय त्यात डाळ किंवा भाज्यांचे प्रमाण जास्त ठेवा.

- आपण वजन कमी करण्यासाठी पालक कॉर्न राईज खाऊ शकता. पालकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि के सारखे जीवनसत्त्वे असतात.

- शिवाय त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पालकामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वेट लॉस करण्यास मदत होते.

सारा अली खान आणि अनन्या पांडे ज्याच्या फॅन, त्या ओरीचा फिटनेस फंडा वाचा..उगीच नाही सेलिब्रिटी त्याच्यावर फिदा..

- पालकामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. १०० ग्रॅम पालकामध्ये २.९ मिलीग्रॅम लोह असते. लोह शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे अ‍ॅनिमियाची समस्या कमी होते.

- कॉर्नमध्येही मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचे प्रमाण जास्त आहे. शिवाय त्यात फायबर आणि प्रोटीनही आढळते. ज्यामुळे चयापचय क्रिया बुस्ट होते, जे वेट लॉस आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत करते.

Web Title: Tips to eat white rice and still lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.