भात खाणं (Rice) सोडल्याने पोट कमी होतं किंवा वजन कमी होतं याबाबत अनेक समज गैरसमज असल्यामुळे लोक भात खाणं टाळतात. (Weight Loss) कारण भातात स्टार्चचे प्रमाण जास्त असते. यात कॅलरीजसुद्धा जास्त असतात. भात खाण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे अनेकांचे वजन वाढते. (Weight Loss How to eat rice while trying to lose weight) आशियाई देशांत मोठ्या प्रमाणात भात खाल्ला जातो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात भाताचा समावेश करू शकता. ज्यामुळे वजन मेटेंन राहण्यास मदत होते. (How to eat rice and lose weight tips to include rice in weight loss diet)
भात खाण्याची योग्य पद्धत कोणती? (What is the Correct Way to Eat Rice )
खाण्यापूर्वी भात कोणत्या पद्धतीने खावा हे समजून घेणं गरजेचं आहे. यामुळे वजन वाढ टाळता येते. तांदूळ एकाच टाईपचे नसतात. तुम्ही आपल्या आहारात जॅस्मिन किंवा बासमती तांदळाचा समावेश करू शकता. छोट्या पांढऱ्या भाताच्या तुलनेत याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्सयुक्त भात खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं आणि ओव्हरइटींगचा धोका टळतो.
भाताबरोबर प्रोटीन्सचाही आहारात समावेश करा. भाताबरोबर डाळी, ब्रोकोली, कडधान्य अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. प्रोटीन्सबरोबर भाताचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल. यामुळे सहज वजन कमी होण्यास मदत होते.
एकदम सॉफ्ट-स्पाँजी ताकातला ढोकळा घरीच करा; १ सिक्रेट पदार्थ घाला, परफेक्ट पांढरा ढोकळा खा
भरपूर भाज्यांचा आहारात समावेश करा (What is the Right Way to Eat Rice)
तांदळाची खिचडी किंवा पुलाव बनवताना त्यात जास्तीत जास्त भाज्या घालून शिजवा. तांदळात भाज्या घातल्याने शरीराला फायबर्स, व्हिटामीन्स अशी खनिजं मिळतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. वजन कमी करण्यासाठी भाज्यांचे सेवन फायदेशीर ठरते.
तांदूळ शिजवण्याची योग्य पद्धत कोणती? (How to cook rice perfectly at home)
तांदूळ शिजवण्याचे अनेक प्रकार आहे. पण विशिष्ट पद्धतीने तांदूळ शिजवले तर त्यातील फॅट्सचे प्रमाण वाढणार नाही. तांदूळ धुण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. गरम पाण्यामुळे तांदळातील एस्क्ट्रा स्टार्च निघून जाईल. तांदूळ शिजवताना तेल घालायला विसरू नका.
पोट, दंडांची चरबी लटकतेय? रात्रीच्या जेवणात खा ५ पदार्थ, झरझर घटेल पोटाची चरबी-फिट दिसा
भात खाण्याची वेळ (What is Right Time to Eat Rice)
तुम्ही कोणत्यावेळी भात खात आहात हे सुद्धा महत्वाचे असते. भात खााण्यासाठी योग्यवेळ दुपारच्या जेवणाची असते. ज्यामुळे शरीराला कार्बोहायड्रेट्स मिळतात आण शरीर दिवसभर एनर्जेटिक राहते. झोपण्याआधी भात खाल्ल्यास जास्त कॅलरीज तयार होतात. रात्री जेवल्यानंतर शरीराची फारशी हालचाल होत नाही यामुळे वजन वाढण्याची आणि शरीर सुस्त होण्याची शक्यता असते. तुम्हाला शरीर मेंटेन ठेवायचे असेल तर तुम्ही रात्रीच्यावेळी भात न खाता दुपारी भात खा.