Join us  

पोट सुटण्याच्या भितीने भात कमी खाता? या पद्धतीने हवा तितका भात खा-१ किलोही वजन वाढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 11:34 AM

Tips to eat White Rice For Weight Loss : आहारात बदल करायचा म्हणजे तुमच्या आवडत्या गोष्टी खायच्या सोडायच्या असं अजिबात नाही.

वजन कमी करणं असो किंवा चरबी घटवणं सगळ्यासाठी डाएट फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत असतील तर तुम्ही आधी  जेवणाकडे लक्ष द्यायला हवं. (Bhat Khalyani vajan vadat ka) वजन कमी करण्यासाठी दीर्घकाळ उपाशी राहण्यापेक्षा योग्य प्रमाणात  मिल्स घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. (Right Way to Eat Rice For Weight Loss)

आहारात बदल करायचा म्हणजे तुमच्या आवडत्या गोष्टी खायच्या सोडायच्या असं अजिबात नाही. (Tips to eat White Rice For Weight Loss) काबुली चणे अनेकांना  खायला आवडतात. काबुली चणे आणि भात खाऊन तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता. आहारतज्ज्ञ राधिका गोयल  यांनी एका हिंदी वेबसाईडला याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Is eating rice at night ok when you plan to lose weight)

वजन कमी करण्यासाठी या पद्धतीने खा काबुली चणे आणि भात

१) एक्सपर्ट्सच्यामते अनेकदा वजन वाढवण्यासाठी लोक भाताला जबाबदार मानतात आणि भात खाणं बंद करातत. पांढऱ्या भातात लायसीन असते जे एक प्रकारचे दुर्मिळ अमिनो एसिड आहे. हे शरीरातील हाार्मोनल बॅलेन्ससाठी गरजेचे असते. याव्यतिरिक्त डायजेशनही चांगले राहते. यामुळे बाऊल मुव्हमेंट सुधारते आणि ब्लोटींगचा त्रास दूर होतो. यात मेथिओनिन असते ज्यामुळे लिव्हरला फॅट तोडण्यास मदत होते. 

२) यात नॅचरल इनोसिटोल असते. जे पीसीओएससाठी उत्तम ठरते.  छोले, राजमा आणि डाळी प्रोटीन्स, कॉम्पलेक्स कार्ब्स, व्हिटामीन आणि जिंक मॅग्नेशियमने परिपूर्ण असतात. म्हणून  भाताबरोबर हे पदार्थ खायला हवेत.  तांदूळ शिजवण्याआधी व्यवस्थित भिजवून नंतर शिजवा किंवा आधी कोरडे तांदूळ भाजून नंतर शिजवा.  ज्यामुळे शरीराला महत्वाचे न्युट्रिएंट्स मिळतील. छोले राजमा १२ तास आधी भिजवावे आणि डाळी कमीत कमी २ ते ३ तास भिजवाव्यात.

३) काबुली चणे खाताना पोर्शन कंट्रोल म्हणजेच किती खाताय याकडे लक्ष द्या.  यामुळे फायबर्स इन्टेक वाढण्यास मदत होते.  सॅलेडचा समावेश करा.

पोटाच्या टायर्समुळे कंबर मागून जाड दिसते? घरी ४ व्यायाम करा, साईड फॅट घटेल-सुडौल दिसाल

४) दही,  दूधी, काकडीचा आहारात समावेश करा. भात  करताना त्यात वेयची आणि आलं घाला.  सॅलेड खाण्याआधी छोले आणि भात खा. याशिवाय  तुम्ही आवडत्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स