एकदा पोटाची चरबी वाढली की संपूर्ण शरीर बेढब दिसू लागतं. हात पाय बारीक आणि पोटच खूप सुटलं असेल तर लोकाचं लक्ष पोटाकडे आधी जातं. वाढलेल्या वजनामुळे गंभीर आजारही उद्भवतात. डायबिटीस, फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांचा समावेश आहे. (5 food for weight loss) वजन कमी करण्याासाठी काही नैसर्गिक पदार्थांचा समावेश करा. आपल्या स्वयंपाकघरातील काही पदार्थ वजन कमी करण्यासाठी गुणकारी ठरतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर व्यायाम करायलाच हवा पण डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करता हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. ( Easy Home Remedies To Reduce Weight)
दालचिनी
दालचिनी ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी ओळखले जाते. दालचिनीच्या सेवनानं ओव्हरइटींग टाळता येतं. ब्लड शुगर लेव्हल कमी होण्याबरोबरच वजनही कमी करता येते. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी करण्यासाठी दालचिनीचं पाणी प्यावे.
मेथी
मेथीच्या पाण्यात सोल्यूबल फायबर्स असतात. यामुळे भूक नियंत्रणात राहते. डायजेशन वाढतं. पचनशक्ती चांगली राहते याशिवाय फॅट बर्निंगची प्रक्रिया वेगानं होतो. ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासही मदत होते.
हळद
हळदीतील करक्यूमिनचे बरेच फायदे आहेत. यात एंटी इंफ्लामेटरी गुण असतात. ज्यामुळे डायजेशन व्यवस्थित राहते याशिवाय वजन कमी करण्यासही मदत होते.
कारलं
हाय ब्लड शुगर आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात कारल्याचा समावेश करायला हवा. यामुळे पोटाची चरबी कमी होते आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते. कारलं खाऊन इंसुलिन सेंसिटिव्हिटी वाढतावता येऊ शकते यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.
ग्रीन टी
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टि फायदेशीर मानली जाते. यात एंटीऑक्सिंडेंट्स असतात आणि मेटाबॉलिझ्म वाढतात. ज्यामुळे पोटाची चरबी वेगानं कमी होण्यास मदत होते.
१) जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कॅलरीज इन्टेक जास्त ठेवा.
२) जास्त गोड पदार्थ खाऊ नका. साखरेला पर्याय म्हणून मध, खजूर, फळं अशा पदार्थांचे सेवन करा.
३) जेवणाच्या वेळा चुकवू नका. दोन जेवणांच्यामध्ये गॅप ठेवा. सतत काहीतरी खात राहिल्याने तुमच्या कॅलरीज वाढू शकतात.
४) रात्री उशीरा जेवणं टाळा. रात्री उशीरा जेवल्यानं अन्न पचायला वेळ लागतो आणि पोटाची चरबी वाढत जाते.
५) रोज चालायला जा. चालल्यानं शरीर हलकं राहतं, कॅलरीज बर्न होतात. यामुळे अनावश्यक फॅट्स वाढत नाहीत.