Join us  

३ आठवड्यांत कमी होईल वजन! त्यासाठी नियमित करा फक्त ३ गोष्टी, दिसा स्लीम-फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2023 5:07 PM

Tips to Loose Weight In 3 Weeks : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यासाठीच ३ सोपे उपाय सांगतात

ठळक मुद्देज्यांना शक्य आहे त्यांनी साध्या चहाऐवजी प्रतिकारशक्ती वाढवणारा चहा घ्यायला हवा.  करा फक्त ३ गोष्टी, आठवड्याभरात दिसेल फरक...

नवीन वर्ष सुरू झालं तसा अनेकांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल. त्यासाठी व्यायाम करणे, आहारात बदल करणे अशा गोष्टी आवर्जून केल्या जातात. सुरुवातीला काही दिवस हा संकल्प पाळला जातो मात्र काही दिवसांतच हा संकल्प मोडतो. पण अवघ्या ३ आठवड्यात वजन कमी झालं तर? ऐकून विश्वास बसणार नाही, मात्र काही गोष्टी योग्य पद्धतीने आणि नियमीतपणे केल्यास त्याचा वजन कमी होण्यास अतिशय चांगला उपयोग होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यासाठीच ३ सोपे उपाय सांगतात, पाहूयात हे उपाय कोणते (Tips to Loose Weight In 3 Weeks). 

१. पाणी पिण्याची पद्धत

१ लीटर पाण्यात सुंठ पावडर आणि वेलची पूड घालून ते उकळा. हे पाणी एक तृतीयांश होईपर्यंत चांगले उकळा आणि मग गार करुन एका बाटलीत भरा आणि दिवसभर एक एक घोट हे पाणी पीत राहा. यामुळे वजन कमी होण्यास चांगला फायदा होईल.

२. व्यायाम 

- १० ते १५ मिनीटे कपालभाती आणि प्राणायाम करा.

- २ सूर्यनमस्कारापासून सुरुवात करा आणि दररोज न चुकता १२ सूर्यनमस्कार घाला.

- दररोज ४० ते ५० मिनीटे चाला

- योगासने करा

३. सरकॅडीयन इंटरमिटंट फास्टिंग

वजन कमी करायचं तर आहाराचे नियम पाळणे महत्त्वाचे असते. सध्या अनेक जण इंटरमिटंट फास्टींग करताना दिसतात. यामध्ये तुम्ही ८ ते १० तासांत खाऊन १४ ते १६ तास काहीच खायचे नसते. तर सरकॅडीयन फास्टींगमध्ये सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही खाऊ शकतो. मात्र सूर्यास्त ते सूर्योदय यांच्यामध्ये अजिबात खायचे नाही. मात्र हे करत असताना किमान ३ आठवडे गोड, तळलेले, पॅकेज फूड अजिबात खायचे नाही. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी साध्या चहाऐवजी प्रतिकारशक्ती वाढवणारा चहा घ्यायला हवा.  

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सलाइफस्टाइलघरगुती उपाय