Join us

बदाम भिजवून खावेत की न भिजवता? पाहा बदाम खाण्याची योग्य पद्धत, नाहीतर बदाम खाऊन बिघडेल पोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 20:20 IST

What is the best way to eat almonds : बदाम खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. याशिवाय आजारांपासूनही लांब राहता येते. मिठाई सजवण्यासाठीही बदामाचा वापर केला जातो. बदामात बरीच पोषक तत्व असतात.

चांगल्या आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.  स्नायू बळकट होण्यासाठी आणि हाडांच्या विकासाठी घराघरांत काजू-बदाम  घातलेले पौष्टीक लाडू खाल्ले जातात. (What is the best way to eat almonds) बदामाचा शीरा किंवा लाडू खाल्ल्याने दिवसभर एनर्जेटीक वाटते आणि लवकर भूकही लागत नाही.  बदाम खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. याशिवाय आजारांपासूनही लांब राहता येते. मिठाई सजवण्यासाठीही बदामाचा वापर केला जातो. बदामात बरीच पोषक तत्व असतात. (Right way to eat almonds every day)

जास्तीत जास्त लोक बदाम भिजवून खातात जेणेकरून जास्त फायदे मिळतील. बदाम असेच खायला हवेत की भिजवून याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहेत.  बदामाच्या सालीची चव कोरडी आणि कडवट असते. सालं काढल्याने बदामाचा गोडवा वाढतो. याशिवाय बदामाची सालं काढून खाल्ल्याने यातील रसायनंही पोटात शिरत नाहीत. (What is the proper way to eat almonds)

डॉक्टर सांगतात बदामात  प्रोटीन्स कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी एसिड्, आयर्न, जिंक, व्हिटामीन ई आणि मिनरल्स असतात. तर बदामाच्या सालीत फायबर्स असतात. त्यामुळे फक्त बदामच नाही तर बदामाचं सालंही तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. बदाम तब्येतीसाठी गरम मानले जातात म्हणून पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो.  ज्यांना पचनाच्या कोणत्याही समस्या नाहीत त्यांनी बदाम सालीसकट खायला हवेत. तर तुम्हाला अन्न पचवण्याचा काही त्रास असेल तर बदामाचे साल काढून खा.

१) बदाम खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. बदामात गुड फॅटी एसिड्स जसं की मोनोसॅच्युरेडेट आणि पॉलिसॅच्युरेडेट फॅट्स असतात जे हृदयासाठी उत्तम ठरतात. 

२) बदाम वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. बदामात फायबर्स, प्रोटीन्स, आणि गुड फॅट्स असतात. त्यामुळे भूक नियंत्रणात राहते. व्यायामाला जाण्याआधी किंवा व्यायाम करून आल्यानंतरही तुम्ही बदाम खाऊ शकता.

३)  भिजवलेले बदाम सालं काढून खाल्ल्यानं  ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. बदामातील मॅग्नेशियम ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरते

४) रात्री भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने आणि स्मरणशक्ती चांगली राहते. यामळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. 

५) बदामात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या  होत नाही. याव्यतिरिक्त त्वचेशी संबंधीत समस्या उद्भवत नाहीत. नियमित रिकाम्या पोटी बदाम  खाल्ल्याने चेहऱ्याची चमक वाढते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सलाइफस्टाइल