Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वरण-भात-पोळी-भाजी खाता, पण जेवणात प्रोटीन किती? १० व्हेज पदार्थ खा, भरपूर मिळेल प्रोटीन

वरण-भात-पोळी-भाजी खाता, पण जेवणात प्रोटीन किती? १० व्हेज पदार्थ खा, भरपूर मिळेल प्रोटीन

Top 10 Protein Rich Food (Protein sathi konte padarth khayche) : आपण रोज पोळी, भाजी भाकरी, डाळ-भात अशा पदार्थांचा आहारात समावेश करतो पण त्यातून पुरेपूर प्रोटीन मिळतंय का याचा विचार अनेकदा केला जात नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 01:55 PM2024-01-07T13:55:41+5:302024-01-08T13:15:49+5:30

Top 10 Protein Rich Food (Protein sathi konte padarth khayche) : आपण रोज पोळी, भाजी भाकरी, डाळ-भात अशा पदार्थांचा आहारात समावेश करतो पण त्यातून पुरेपूर प्रोटीन मिळतंय का याचा विचार अनेकदा केला जात नाही.

Top 10 Protein Rich Food : Cheap and Healthy 10 Protein Rich foods List of Protein Rich Vegetarian Food | वरण-भात-पोळी-भाजी खाता, पण जेवणात प्रोटीन किती? १० व्हेज पदार्थ खा, भरपूर मिळेल प्रोटीन

वरण-भात-पोळी-भाजी खाता, पण जेवणात प्रोटीन किती? १० व्हेज पदार्थ खा, भरपूर मिळेल प्रोटीन

प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे तब्येतीच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Protein Deficiency) जसं की मांसपेशी कमकुवत होणं, इम्यूनिटी कमी होणं, शरीराचा योग्य पद्धतीने विकास न होणं. (Vegetarian Protein Sources) प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येऊ शकतो. यामुळे मसल्सच्या ग्रोथवरही परिणाम होतो आणि शारीरिक क्रिया सुरळीत होत नाहीत.  प्रोटीन्ससाठी तुम्ही रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता हे पाहूया. (Veg Foods For Protein)

आपण रोज पोळी-भाजी, भाकरी , वरण-भात अशा पदार्थांचा आहारात समावेश करतो पण त्यातून पुरेपूर प्रोटीन मिळतंय का याचा विचार अनेकदा केला जात नाही. बेटर हेल्थ.कॉमच्या रिपोर्टनुसार प्रोटीन्स शरीराला पोषक तत्व देण्यासाठी नवीन पेशींच्या निर्मितीसाठी गरजेचे असते. वय, लिंग, वजन यानुसार प्रोटीन्सची आवश्यकता वेगवेगळी असते. २० प्रकारच्या अमिनो एसिड्सच्या कॉम्बिनेशन्समधून प्रोटीन्स तयार होतात.

ग्रीक योगर्ट

साधारण दह्यापेक्षा ग्रीक योगर्ट जास्त घट्ट असते. बाजारात हे सहज उपलब्ध होते. तुम्ही आहारात ग्रीक योगर्टचा समावेश करू  शकता. यामुळे पदार्थाची चवही वाढते. तुम्ही मीठ, अखरोट, मध  हे पदार्थ यात मिसळू शकता. (10 Best Vegetarian High Protein Sources)

दूध

फक्त कॅल्शियम नाही तर दूधही प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहे. दूधात जास्त  गुणवत्ता असलेले प्रोटीन्सयुक्त घटक असतात.  एक ग्लास दूध हा परफेक्ट ब्रेकफास्ट आहे. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. 

नट्स 

अक्रोड, बदाम, पिस्ता यांसारख्या ड्रायफ्रुट्सचा तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये समावेश करू शकता. यामुळे फक्त वजन कमी होणार नाही तर हृदयाच्या आजारांचा धोकाही टळेल हा एक आदर्श ब्रेकफास्ट आहे. नट्स्, ड्रायफ्रुट्स हे हाय कॅलरीजयुक्त असल्यामुळे मर्यादित प्रमाणात याचे सेवन करा.

कॉटेज पनीर

कॉटेज पनीर एक नाईट स्नॅक्स आहे. यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि सॅलेड किंवा भाज्यांमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता.

मसूरची डाळ

शाकाहारींसाठी मसूरची डाळ हा प्रोटीन्सचा सर्वात उत्तम पर्याय आहेय. यात पोषक तत्व आणि फायबर्स, फॉलेट, मँगनीज, आयर्न, फॉस्फरेस आणि व्हिटामीन  भरपूर असतात.  यातील प्रोटीन्स हृदयाला निरोगी ठेवतात. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

ओट्स

ओट्स हा प्रोटीन्सचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे. हे एक कॉम्पलेक्स कार्ब्स आहे.  ताजी फळं, नट्स, यासांरख्या खाद्यापदार्थांबरोबरच तुम्ही ओट्सचा आहारात समावेश करू शकता. 

 बटाटा

बटाट्याला एक स्टार्चयुक्त भाजी असे म्हटले जाते. यात प्रोटीन्सशिवाय इतर अनेक पोषक तत्व असतात.  एका उकळेल्या आणि मॅश केलेल्या बटाट्यात प्रोटीन्स, कार्ब्स यांसारखी पोषक तत्व असतात.

एकाच दिवसात किती बदाम खावे? भिजवून खावे की न भिजवता? पाहा योग्य पद्धत-तरच होईल फायदा

बदाम

बदाम एक हेल्दी स्नॅक्स आहे. यात प्रोटीन्स, एंटी ऑक्सिडेंट्स, अनसॅच्युरेडेट फॅट्स, फायबर्स असतात. बादाम खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. ब्लड शुगर लेव्हल चांगली राहते. बदामाचे बटर घरी बनवून तुम्ही ब्रेडलाही लावू शकता. 

चणे

चणे तुम्ही कडधान्यांच्या स्वरूपातही खाऊ शकता. चण्याचे सेवन केल्याने दिवसभर शरीर एनर्जेटिक राहते. शरीराला उर्जाही मिळते कारण यात बरेच प्रोटीन्स असतात.

कंबर जाडजूड-पोटही सुटलंय? घरीच रोज करा फक्त १ सोपं योगासन, कमनीय होईल फिगर

शेंगदाणे

मूठभर शेंगदाण्यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम मिळेल. शेंगदाणे खाल्ल्याने दिवसभर शरीर एर्नेजेटिक राहील आणि तुम्हाला थकवाही जाणवणार नाही.

Web Title: Top 10 Protein Rich Food : Cheap and Healthy 10 Protein Rich foods List of Protein Rich Vegetarian Food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.