Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थकल्यासारखं वाटतं-कंबर दुखते? रोज फक्त १ लाडू खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा दूर

थकल्यासारखं वाटतं-कंबर दुखते? रोज फक्त १ लाडू खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा दूर

Top 3 foods for Tiredness and lethargy : या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास भरपूर एनर्जी मिळेल आणि थकवा अशक्तपणा जाणवणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:23 PM2023-10-12T12:23:59+5:302023-10-12T12:34:21+5:30

Top 3 foods for Tiredness and lethargy : या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास भरपूर एनर्जी मिळेल आणि थकवा अशक्तपणा जाणवणार नाही.

Top 3 foods for Tiredness & lethargy : Alive ladoo to chashews in lunch foods for lethargy by rujuta diwekar | थकल्यासारखं वाटतं-कंबर दुखते? रोज फक्त १ लाडू खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा दूर

थकल्यासारखं वाटतं-कंबर दुखते? रोज फक्त १ लाडू खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा दूर

झोप पूर्ण झाल्यानंतरही अनेकांना एनर्जी नसल्याप्रमाणे किंवा अशक्तपणा आल्यासारखं वाटतं. कोणतंच काम करायचा उत्साह राहत नाही. (Top 3 foods for Tiredness and lethargy) दुपारच्या जेवणानंतरही थकवा आल्यासारखं वाटतं. सेलिब्रिटी डायटिशियन रुजूता दिवेकर यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास भरपूर एनर्जी मिळेल आणि थकवा अशक्तपणा जाणवणार नाही. (Alive ladoo to chashews in lucnch foods for tireedness and lethargy by rujuta diwekar)

हालीमचे लाडू

सेलिब्रिटी आहारातज्ज्ञ रुजूता दिवेकर सांगतात की हालीमच्या बीयाचे लाडू थकवा, सुस्ती दूर करतात. या बियांचे सेवन फॉलिक एसिड आणि आयर्नने परिपूर्ण असते याव्यतिरिक्त शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासह एनर्जी लेव्हलही वाढते. ज्यामुळे शरीरात सुस्ती, थकवा जाणवत नाही. (Nutritionist-approved foods for tiredness and lethargy)

रात्री भिजवून सकाळी खा ५ पदार्थ; प्रोटीन-व्हिटामीन भरपूर मिळेल, गॅस-पोटाचे त्रास होतील दूर

तूर डाळ

सगळ्यात आधी तूर डाळ ५ ते ६ तासांसाठी भिजवून ठेवा. त्यानंतर डाळ कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवा. डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर कांदा, मिरची, टोमॅटो घालून याचे सॅलेड बनवून सेवन करा तुम्ही वरणाच्या स्वरूपातही खाऊ शकता. या  डाळीत मिनरल्स, प्रोटीन्सचे प्रमाण चांगले असते. याव्यतिरिक्त शुगर स्पाईक होण्यापासून टाळता येतं. 

काजू

अनेकदा आपण शरीरापेक्षा जास्त मेंदूने थकललो असतो. सकाळी उठल्यानंतर किंवा  दुपारच्या जेवणाच्या वेळी तुम्ही काजू खाऊ शकता. मॅग्नेशियमने परिपूर्ण काजू हृदयाच्या आरोग्यासाठी हेल्दी असतात. रात्री झोपण्याआधी दूधाबरोबर काजू खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं. जास्त थकवा आणि सुस्ती येत नाही. या  ३ पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

१ ग्लास दूधात हे पदार्थ मिसळून प्या; कंबर-गुडघेदुखीपासून मिळेल आराम- अंगातलं रक्तही वाढेल

दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. शरीराबरोबर मेंदूच्या आरोग्यासाठीही हे उत्तम आहे. यामुळे आळस दूर होईल आणि एनर्जी टिकून राहील. फक्त १५ मिनिटांचा व्यायाम केल्यानं तुम्हाला फ्रेश वाटेल. अनेकजण तासनतास टिव्ही पाहत बसतात. अशा स्थितीत त्यांच्या झोपेचे रूटीन बिघडू शकते आणि आरोग्यावरही चुकीचा परिणाम होतो. यामुळे शरीरात आळस वाढतो. झोप शरीरासाठी फार महत्वाचची असते. आळस येऊ नये यासाठी रोज वेळच्यावेळी झोपा आणि  ८ तासांची झोप घ्या.

Web Title: Top 3 foods for Tiredness & lethargy : Alive ladoo to chashews in lunch foods for lethargy by rujuta diwekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.