Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > हिमोग्लोबिन नेहमी कमीच असतं? ३ प्रकारच्या गोष्टी खा, लोहाची कमतरता होईल दूर

हिमोग्लोबिन नेहमी कमीच असतं? ३ प्रकारच्या गोष्टी खा, लोहाची कमतरता होईल दूर

How to Improve Haemoglobin Level: हिमोग्लोबिन म्हणजेच एचबी कमी असण्याचा त्रास अनेक जणींना असतो. महिला आणि लहान मुलांचे प्रमाण तर यात जास्त आहे. म्हणूनच आहारात (Top 3 foods for treating iron deficiency) असे काही बदल करून बघा. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 01:35 PM2022-12-16T13:35:23+5:302022-12-16T15:57:22+5:30

How to Improve Haemoglobin Level: हिमोग्लोबिन म्हणजेच एचबी कमी असण्याचा त्रास अनेक जणींना असतो. महिला आणि लहान मुलांचे प्रमाण तर यात जास्त आहे. म्हणूनच आहारात (Top 3 foods for treating iron deficiency) असे काही बदल करून बघा. 

Top 3 foods for treating iron deficiency! Have these food items if you are always suffering from low Haemoglobin Level | हिमोग्लोबिन नेहमी कमीच असतं? ३ प्रकारच्या गोष्टी खा, लोहाची कमतरता होईल दूर

हिमोग्लोबिन नेहमी कमीच असतं? ३ प्रकारच्या गोष्टी खा, लोहाची कमतरता होईल दूर

Highlightsहिमोग्लोबिनची कमतरता असेल तर मात्र थकवा, अशक्तपणा, ॲनिमिया, केस गळणे, त्वचा सुरकुतने, नखांची वाढ न होणे, श्वास अपूरा पडणे, पाय दुखणे, डोकेदुखी, रोग प्रतिकारशक्ती कमी असणे असे वेगवेगळे त्रास होतात.

हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आपल्या शरीराला लोहाची गरज असते. हिमोग्लोबिन शरीरात योग्य प्रमाणात असेल तर सर्व अवयवांना याेग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. जर लोहाची किंवा हिमोग्लोबिनची कमतरता (low Haemoglobin Level) असेल तर मात्र थकवा, अशक्तपणा, ॲनिमिया, केस गळणे, त्वचा सुरकुतने, नखांची वाढ न होणे, श्वास अपूरा पडणे, पाय दुखणे, डोकेदुखी, रोग प्रतिकारशक्ती कमी असणे असे वेगवेगळे त्रास होतात. म्हणूनच असे सर्व त्रास थांबविण्यासाठी हिमोग्लोबिन, लोह योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणकोणते अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत (Top 3 foods for treating iron deficiency) याची माहिती इन्स्टाग्रामच्या drdimplejangda या पेजवर डॉ. डिंपल यांनी शेअर केली आहे. 

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ
१. ग्रीन फूड आणि फळं

यात प्रामुख्याने पालक, कोथिंबीर, कढीपत्ता, फ्रेंच बीन्स, मटार, मूग, काकडी, गाजर, बीटरूट, टोमॅटो, कांदा, डाळिंब, काळी द्राक्षे, कोबी, फ्लॉवर अशा भाज्यांचा आणि फळांचा सहभाग असतो. 

 

२. पिवळे आणि नारंगी पदार्थ
व्हिटॅमिन सी असणारे फळं अधिकाधिक प्रमाणात खायला पाहिजेत. कारण वरील अन्नपदार्थांच्या गटामधून मिळालेले लोह शरीरात योग्य पद्धतीने शोषल्या जावे, यासाठी व्हिटॅमिन सी ची खूप गरज असते.

कतरिना कैफचा २ लाखांचा चमचमता सेक्विन ड्रेस, ड्रेसवरची चमक अशी की... बघा व्हायरल फोटो

त्यामुळे लिंबू, टोमॅटो, मोसंबी, संत्री, आवळा, पपई, स्ट्रॉबेरी, अननस, आंबा, पेरू, किवी, चेरी प्रकारातली फळं तसेच ब्रोकोली, पिवळी सिमला मिरची असे पदार्थ खावेत.

 

३. कॉन्स्टीपेशनचा त्रास होऊ नये म्हणून..
शरीरातील लोहाचे प्रमाण वाढले की अनेक जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होता. हा त्रास होऊ नये म्हणून नारळ, नारळाचं तेल किंवा दूध, ऑलिव्ह ऑईल, बदामाचं तेल, तूप, अव्हाकॅडो असे कार्ब्स आणि गूड फॅट्स जास्त असणारे पदार्थही आहारात असावेत. याशिवाय सकाळच्या कोवळ्या उन्हात २० मिनिटे तरी बसावे. जेणेकरून व्हिटॅमिन डी मिळेल.  

 

 

Web Title: Top 3 foods for treating iron deficiency! Have these food items if you are always suffering from low Haemoglobin Level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.