Join us  

खाणं कमी तरी पोट सुटत चाललंय? रोज न चुकता किचनमधले ४ पदार्थ खा, भराभर घटेल वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:15 PM

Top 4 Foods To Eat To Lose Weight : दालचिनीत फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं आणि इतर पदार्थ खाणं टाळता येतं.

आजकाल लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बेली फॅट वाढत आहे हे कमी करणं खूपच कठीण असतं. (Weight Loss Foods) ज्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे सेवन करू शकता. काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही बेली फॅटपासून  काही दिवसांतच सुटका मिळवू शकता. (How To Lose Weight)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी डाएट (Weight Loss Tips)

1) दालचिनी

मेडीसिन नेटच्या रिपोर्टनुसार  दालचिनीमुळे मेटाबॉलिझ्म वाढण्यास मदत होते.  इम्यूनिटी चांगली राहते. याशिवाय थकवाही जाणवत नाही. पचनक्रिया चांगली राहण्यासही मदत होते. ब्रेन फंक्शन सुधारते आणि हृदय रोगाचा धोकाही कमी होतो. बेली फॅट कमी करण्यासाठी दालचिनीला आपल्या डाएटचा भाग बनवा.  दालचिनीचे पाण्यात भिजवून ठेवा. जेवण झाल्यानंतर  गाळून या पाण्याचे सेवन  करा. दालचिनीत फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं आणि इतर पदार्थ खाणं टाळता येतं. यात सोल्यूबल फायबर्स असते ज्यामुळे बराचवेळ पोट भरलेलं राहतं आणि लवकर भूकही लागत नाही.

२) एप्पल सायडर व्हिनेगर

एप्पल सायडर व्हिनेगर पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. जेवणाआधी १ ग्लास पाण्यात १ चमचा एप्पल सायडर व्हिनेगर घालून प्या.  ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल तुम्ही सॅलेडमध्ये घालून  एप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन करू शकता. 

३) मेथीच्या बीया

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार बेली फॅट कमी करण्यासाठी मेथीच्या बीया उत्तम ठरतात. यासाठी एक चमचा मेथीच्या दाण्यांना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. (Ref) सकाळी गाळून या पाण्याचे सेवन करा. असं केल्याने कमीत कमी वेळात तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

४) ड्रायफ्रुट्स

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्याला ड्राय फ्रुट्सचे सेवन करा.  यासाठी रात्री पाण्यात ड्रायफ्रुट्स भिजवून ठेवा. संशोधनानुसार गुड फॅट्स मोनोसॅच्युरेडेट फॅट, ओमेगा-३ फॅटी एसिड्टससयुक्त बिया बेली फॅट कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स