Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ओटीपोट फार सुटलंय? चपाती किंवा भाताबरोबर 'या' ४ भाज्या खा, पटकन वजन कमी होईल

ओटीपोट फार सुटलंय? चपाती किंवा भाताबरोबर 'या' ४ भाज्या खा, पटकन वजन कमी होईल

Top 4 Vegetables Good For Weight Loss : भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्याच्या सेवनाने शरीराला फायदेच फायदे मिळतात.  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 09:01 AM2024-01-15T09:01:33+5:302024-01-15T16:39:26+5:30

Top 4 Vegetables Good For Weight Loss : भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्याच्या सेवनाने शरीराला फायदेच फायदे मिळतात.  

Top 4 Vegetables Good For Weight Loss : Best Vegetables For Weight Loss Research Based Vegetable Weight Loss | ओटीपोट फार सुटलंय? चपाती किंवा भाताबरोबर 'या' ४ भाज्या खा, पटकन वजन कमी होईल

ओटीपोट फार सुटलंय? चपाती किंवा भाताबरोबर 'या' ४ भाज्या खा, पटकन वजन कमी होईल

निरोगी राहण्यासाठी  सिजनल फ्रुट्स आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. याबरोबरच डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये बदलही करायला हवेत. (Weight Loss Tips) हिवाळ्याच्या दिवसांत जर  तुम्ही वजन  कमी करण्याच्या प्रयतत्नात असाल आपल्या आहारात सोपे बदल करून तुम्ही स्वत:ला कायम फिट मेंटेन ठेवू शकता. ( Vegetable to Include In your Diet To Burn Belly Fat)

आयुर्वेदानुसार हेल्दी राहण्यासाठी वातावरणानुसार आहारातही बदल करायला हवेत. भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्याच्या सेवनाने शरीराला फायदेच फायदे मिळतात.  आहारतज्ज्ञ मनोली मेहता यांनी एका हिंदी बेवसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Top 4 Vegetables  Good For Weight Loss) रोजच्या जेवणाच्या ताटात या भाज्यांचा समावेश करून तुम्ही फिट, मेंटेन राहू शकता. 

पालक (Spinach)

हिवाळ्यात पालकाचा आहारात समावेश करायला विसरू नका. पालकात आयर्नचे प्रमाण भरपूर असते. ज्या लोकांच्या शरीरात रक्त कमी  आहे त्यांनी पालकाचा आहारात समावेश करावा. यामुळे एनर्जी लेव्हल बुस्ट होते. नॅशनल सेटर फॉर  बायोटेक्नोलॉजीच्या रिपोर्टनुसार रिसर्चमध्ये असे दिसून आले की  ५ ग्रॅम पालक अर्क, गोड आणि चरबीयुक्त पदार्थांची क्रेव्हिंग्स कमी करते. (Ref) पालकाच्या सेवनाने क्रेव्हिग्स कमी होतात कारण यात ग्लुकागॉन सारखी पेप्टाईड-१ असते. जे तुमच्या अन्नप्रणालीवर काम करते. जास्त वजन असलेल्या महिलांवर केलेल्या अभ्यासात दिसून आले की ३ महिन्यात वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांनी रोज (Ref) ५ ग्रॅम पालकाचा अर्क घेतल्याने  ४३ टक्क्यांपेक्षा जास्त वजन कमी झाले होते.

केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

हिरवा कांदा (Green Onion)

हिवाळ्यात बाजारात कांद्याची पात सहज मिळेल. यात एंटी ऑक्सिडेंटस, व्हिटामीन ए, सी जास्त प्रमाणात  सते ज्यामुळे इम्यून सिस्टीम चांगली राहते आणि आजारांचा धोकाही टळतो. यात सल्फर कम्पाऊंड्सही असतात  जे हृदयाच्या आरोग्यसाठी उत्तम मानले जातात.  कांद्यात एंटी ओबेसिटी गुण असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

पुदीना (Mint Leaves)

पुदीना शरीराला डिटॉक्स  करतो. ज्यामुळे शरीरातील हानीकारक टॉक्सिन्स बाहेर पाडतात आणि डायजेशन चांगले राहते. यामुळे ब्लोटींग, अपचनाशी समस्या दूर होते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स  श्वासांना येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. पुदीन्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. डोकेदुखी, स्ट्रेस येत नाही.

कोण सांगतं चपाती खाल्ल्यानं वजन वाढतं? दिवसभरात 'एवढ्या' चपात्या खा, मेंटेन-स्लिम दिसाल

हिरवे मटार (Green Peas)

हिरव्या मटारमध्ये  प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे मसल्स ग्रोथ चांगली होते.  मटारमध्ये फायबर्स, व्हिटामीन बी आणि व्हिटामीन के मोठ्या  प्रमाणात असते.  ज्यामुळे डायजेशन चांगले राहते आणि ओव्हरऑल आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. मटार एक लो कॅलरी भाजी आहे. कमी खाल्ले तरी बराचवेळ पोट भरलेलं रहातं आणि वजन कमी करण्यास ही मदत होते. 

 

Web Title: Top 4 Vegetables Good For Weight Loss : Best Vegetables For Weight Loss Research Based Vegetable Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.