आपलं शरीर तेव्हाच चांगले राहते तेव्हा शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळतात. (Tips For Healthy Bones) व्हिटामीन आणि कॅल्शियम शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी महत्वाचे ठरतात. (bone's sathi kay khayche) मजबूत हाडं आणि दात निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम गरजेचे असते. (Best Calcium Rich Foods) महिला आणि वयस्कर व्यक्तींमध्ये जेव्हा कॅल्शियमची कमतरता भसते तेव्हा त्यांना सांधेदुखी, दात दुखणं अशा समस्या उद्भवतात. अशावेळी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करून तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता. (Calcium Rich Foods)
व्हिटामीन डी आणि आयर्न यांसारखे शरीराला आवश्यक असणारे मायक्रोन्युट्रिए यात असतात. जे हाडांसाठी आणि मांसपेशींसाठी आवश्यक असतात. जवळपास ९९ टक्के कॅल्शियम हाडं आणि दातांमध्ये जमा होतं. कॅल्शियम शरीरासाठी आवश्यक आहे कारण कॅल्शियमच्या सेवनाने हाडांना मजबूती मिळते, सांधेदुखीच्या वेदना जाणवत नाहीत, शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. ( Food Sources Of Calcium For Your Bones)
कॅल्शियम मिळवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
भाज्या
कॅल्शियमयुक्त पदार्थांसाठी भाज्या उत्तम पर्याय आहेत. बेटरहेल्थ साईटनुसार हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम रिच पदार्थ असतात. पालक, मेथी, पुदीना यांसारख्या भाज्यांमध्ये आयर्न, व्हिटामीन्सबरोबर कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. तर तुम्ही मांसाहार करत नसाल तर भाज्या खाऊन भरपूर कॅल्शियम मिळवू शकता.
शेंगा आणि डाळी
अनेकजण आपल्या आहारात डाळी आणि शेंगाचा समावेश करता. यामुळे शरीला पुरेपूर कॅल्शियम मिळते. कॅल्शियमच्या चांगल्या स्त्रोतात डाळी आणि भाज्यांचा समावेश आहे. चणे, बीन्स, डाळी यात जिंक आणि आयर्नबरोबर कॅल्शियमसुद्धा मोठ्या प्रमाणात असते.
वयाच्या ५८ व्या वर्षीही सुपरफिट-हॉट दिसणारे मिलिंद सोमण काय खातात? पाहा साधा डाएट प्लॅन
आंबट फळं
कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी व्हिटामीन्सयुक्त आंबट फळांचा आहारात समावेश करा. संत्री ऑरेंज यांसारखे पदार्थ पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. यात व्हिटामीन सी बरोबरच कॅल्शियमसुद्धा असते.
ड्रायफ्रुट्स
ड्रायफ्रुटसचे सेवन तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच डॉक्टर नियमित या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात याशिवाय कॅल्शियमही असते. आहारात सुक्या मेव्याव्यतिरिक्त इतर कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास शरीर निरोगी राहते.
पोटावर कपडे घट्ट होतात-शर्टाची बटन्स लागत नाही? ५ गोष्टी करा-पोट कमी होईल; मेंटेन राहाल
दूध आणि पनीर
पनीर आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. तुम्ही रोज ग्लासभर दूध पिऊन शरीर निरोगी ठेवू शकता. याशिवाय चीझ, पनीर, तूप अशा पदार्थांचा रोजच्या जेवणात समावेश करा.