Join us  

कंबर दुखते-शरीरात कॅल्शियमच कमी? रोज ५ पदार्थ खा, मिळेल भरपूर कॅल्शियम, हाडं मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 3:25 PM

Top 5 Foods For Calcium : कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही डेअरी उत्पादनांचा आहारात समावेश करू शकता. 

शरीरातील सर्व हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. (Foods For Calcium) कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. जर शरीरात कॅल्शियम नसेल तर थकवा येणं, कमकुवतपणा, थकल्यासारखं वाटणं असी लक्षणं जाणवतात. कॅल्शियम मिळवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. भारतातील प्रसिद्ध  आहारातज्ज्ञ निखिल वत्स यांनी लहान मुलाांच्या आहारात कॅल्शियमसाठी कोणते पदार्थ असावेत याबाबत सांगितले आहे. (Which Is Top 5 Foods For Calcium)

युनायटेड स्टेट्स न्युट्रिशन बोर्डाने रोजच्या कॅल्शियमच्या गरजेचे प्रमाण सांगितले आहे. त्यानुसार ० ते ६ महिने वयोगटातील बालकांना २०० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.  ७ ते १२ महिने वयोगटातील बालकांना २६० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते, (Ref) १ ते ३ वर्ष वयोगटातील लोकांना  ७०० मिलीग्राम, ४ ते ८ वर्षवयोगटातील लोकांना १००० मिलीग्राम, ९ ते १८ वर्षवयोगटातील लोकांना १,३०० मिलीग्राम, १९ ते ५० वर्षवयोगटातील लोकांना १००० मिलीग्राम , ५१ ते ७० वर्ष वयोगटातील लोकांना १,२०० मिलीग्राम, ७० पेक्षा जास्त वय असलेल्यांना १२०० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. (What To Eat For Calcium)

डेअरी प्रोडक्ट्स

दूध, दही आणि चिझ हे पदार्थ कॅल्शियमचे परिपूर्ण असतात. ज्यामुळे शरीरात जास्तीत जास्त कॅल्शियम शोषले जाते. कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही डेअरी उत्पादनांचा आहारात समावेश करू शकता. 

ब्रोकोली

ब्रोकोली तब्येतीसाठी बरीच फायदेशीर ठरते. लहान मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ब्रोकोली बनवून खाऊ घालू शकता. कॅल्शियम आणि कोलोजन हाडांच्या आरोग्याला मजबूत करण्यास फायदेशीर ठरते. ज्यामुळे इम्यून सिस्टिम मजबूत होते आणि तब्येतही चांगली राहण्यास मदत होते. रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश असायला हवा. ज्यामुळे गंभीर आजारांपासून बचाव होतो. 

पाळीचा खूप त्रास होतो, अनियमित येते? चहात 'हा' पदार्थ मिसळून प्या- डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय

सोयाबीन

सोयबीन मुलांना खूप आवडते. यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. यात आयर्न,  प्रोटीन्स यांसारखी पोषक तत्व असतात.   लहान मुलांच्या नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश असायलाच हवा. डायबिटीसच्या रुग्णांसाठी सोयाबीनचे सेवन फायदेशीर ठरते. लहान मुलांच्या डाएटमध्ये याचा समावेश असायलाच हवा. हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी रोज भिजवलेल्या  सोयाबिन्सचा आहारात समावेश करावा.

२ रूपयांची तुरटी नारळाच्या तेलात मिसळून लावा; पांढरे केस होतील काळे, तुरटीचे ५ भन्नाट फायदे

दूधाबरोबर नट्स

लहान मुलांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी नट्स खाण्यावर लक्ष द्या. यात व्हिटामीन ई, कॉपर, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्व असतात.  मुलांच्या शरीरासाठी ते फायदेशीर ठरते. बदाम, अक्रोड या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

पालक

पालकात मोठ्या प्रमाणात पोषण असते. आहारात पालकाचा समावेश केल्यास पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. शारीरिक आणि मानसिक विकासाठीसुद्धा पालक फायदेशीर ठरते.  पालकाचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासही मदत होते. पालक खाल्ल्याने शरीर आतून मजबूत राहते.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स