Join us  

रोजच्या व्हेज जेवणातूनच मिळेल भरपूर प्रोटीन, ५० रुपये खर्च केले तरी मिळतात असे ६ पदार्थ खा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:43 AM

Top 6 low cost protein foods : शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जसं की थकवा येणं, कमकुवतपणा येणं. मांसपेशी संकुचित होणं.

प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि फॅट अशा तीन मायक्रोटन्युट्रिएंटसपैकी एक आहे . ते शरीराच्या विकासासाठी आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. हे अमिनो एसिडपासून तयार झालेले असते. (food for protein) मांसपेशींच्या विकासासाठी आणि शरीराला बळ मिळण्यासाठी प्रोटीन्स फायदेशीर ठरतात यामुळे इम्यूनिटी वाढते आणि आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. पचन आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी याशिवाय पोषक तत्व मिळण्यासाठी प्रोटीन्स फायदेशीर ठरतात. (Protein kashat aste)

शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जसं की थकवा येणं, कमकुवतपणा येणं. मांसपेशी संकुचित होणं. (Cheap and Healthy Sources of Protein) यामुळे शारीरिक क्षमतेवरही परिणाम होतो. केस गळतात, नखं पातळ होणं, इन्फेक्शन यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अंगात रक्त कमी झाल्यास एनिमियाची समस्या उद्भवते. 

दूध

दुधात कॅल्शियमबरोबर प्रोटीन्सही असतात दूधाच्या सेवनाने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. इतकंच नाही हाडांच्या विकासासही मदत होते.

५४ वर्षीय भाग्यश्रीच्या दाट-शायनी केसाचं सिक्रेट; सुंदर केसांसाठी २ प्रकारच्या तेलाने करते मालिश

ड्रायफ्रुट्स

रोज रात्री भिजवून सकाळी ड्रायफ्रुट्सचे सेवन करायला हवे.  बदाम, काजू, पिस्ता, मनुके तुम्ही रोज खाऊ शकतात. तुम्ही पाहिलं असेल की बॉडी बिल्डर्स रोज न चुकता बदाम खातात. यामुळे प्रथिने मोठ्या प्रमाणात मिळतात. 

दही

ज्यांना  दूध प्यायला आवडत नाही त्यांनी रोज एक वाटी दही दुपारच्या जेवणात खायला हवं. यामुळे तुम्हाला प्रोटीन्स मिळतील  आणि पोट थंड राहण्यास मदत होईल.

काळे चणे

काळ्या चणांना भिजवून नंतर शिजवून तुम्ही खाऊ शकता.  दिवसाची सुरूवात करताना तुम्ही चण्यांचे सेवन केले तर पुर्ण दिवस पोट भरलेलं राहील आणि उर्जा मिळेल. याशिवाय प्रोटीन्सची कमतरताही जाणवणार नाही.

भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही? भात खाण्याचा शरीरावर ‘असा’ परिणाम होतो, तज्ज्ञ सांगतात..

लस्सी किंवा ताक

दूध किंवा दह्याशिवाय  लस्सी सुद्धा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही नाश्ता किंवा जेवणाच्या मधल्यावेळेत ताक लस्सीचा समावेश करू शकता. गरमीच्या दिवसात लंच आणि डिनरच्या मधल्या गॅपमध्ये याचे सेवन करा. 

राजमा

राजमा प्रोटिन्सनी परिपूर्ण असा पदार्थ आहे. जर तुम्ही वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल तर राजमा खाऊ शकता. यामुळे फॅट वाढणार नाही आणि पुरेपूर प्रोटीन मिळेल.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य