Join us  

पावसाळ्यात नेहमीच पोट बिघडतं? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात 'हे' पदार्थ नियमित खा, पोट राहील ठणठणीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2024 3:28 PM

How To Avoid Indigestion In Rainy Days: पावसाळ्याच्या दिवसांत खाण्यात थोडंही काही कमी- जास्त झालं की लगेच पोट बिघडतं. म्हणूनच कोणते पदार्थ या दिवसांत खावेत, याविषयी वाचा आयुर्वेदतज्ज्ञांचा खास सल्ला....(Top Monsoon Food according to Ayurveda)

ठळक मुद्देआयुर्वेदतज्ज्ञ असं सांगतात की पावसाळ्यात आपण आंबट, गोड, चटपटीत अन्न खाण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. या चवीचे आपल्याकडचे जे पारंपरिक पदार्थ आहेत, ते वातशामक आहेत.

पावसाळ्याचे दिवस कितीही हवेहवेसे वाटत असले तरी या दिवसांत खाण्यापिण्याची खूपच काळजी घ्यावी लागते. मोजून मापून खावे लागते. तसेच काही पदार्थ खाणं तर कटाक्षाने टाळावंच लागतं. एवढी सगळी काळजी घेऊनही बऱ्याचदा पावसाळ्यात पोट दुखतं, अपचनाचा त्रास होतो (how to avoid indigestion in rainy days). याचं कारण म्हणजे पावसाळ्यात शरीरामध्ये वात किंवा वायू जास्त प्रमाणात तयार होतो. त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्याला शांत करण्यासाठी काही पदार्थ या दिवसांत आवर्जून खायलाच पाहिजेत (Top Monsoon Food according to Ayurveda). ते पदार्थ नेमके काेणते याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती....(best food for monsoon to boost immunity)

 

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात कोणते पदार्थ खायला पाहिजेत?

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात कोणते पदार्थ खायला पाहिजेत याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेली माहिती chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये आयुर्वेदतज्ज्ञ असं सांगतात की पावसाळ्यात आपण आंबट, गोड, चटपटीत अन्न खाण्यास प्राधान्य दिलं पाहिजे.

थेंबभरही तेल न घालता करा कैरीचं चटपटीत लोणचं- घ्या गावाकडची एकदम खास पारंपरिक रेसिपी

या चवीचे आपल्याकडचे जे पारंपरिक पदार्थ आहेत, ते वातशामक आहेत. त्यामुळे या दिवसांत पोटात तयार होणारा वात किंवा वायू शांत करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. शिवाय या दिवसांत आपण जे अन्न खाऊ ते ताजं, गरम, ओलसर, उकडून किंवा शिजवून घेतलेलं आणि पचनास हलकं असावं.

 

त्यामुळे या दिवसांत वेगवगळ्या भाज्यांचे सूप प्या. आहारातील ज्वारी कमी करून गव्हाचे प्रमाण वाढवा. वेगवेगळ्या प्रकारच्या खीर या दिवसांत खा. तसेच तांदूळ किंवा भाताचे वेगवेगळे प्रकार खा, असं आयुर्वेदतज्ज्ञ सुचवतात.

केस वाढतील भराभर होतील दाट, त्वचाही दिसेल सुंदर- तरुण, त्यासाठी फक्त ३ पदार्थ रोज खा

तसेच या दिवसांत चिंच किंवा लिंबू टाकून केलेली पुदिन्याची चटणी, कोथिंबीरीची चटणी असे चटपटीत पदार्थही खा. ते वातशामक आहेत, अशी माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे. अर्थातच हे सगळे पदार्थ अतिरेक न करता प्रमाणशीर खाल्ले तरच त्याचा शरीरासाठी उपयोग होतो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नपावसाळा आणि पावसाळी आजारपणहेल्थ टिप्स