Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

Top Six Health benefits of Eating Peanuts in Winter (Shengdane Khanyche Fayde) : प्रोटीन्स मांसपेशींच्या विकासातही मदत करतात.  मसल्स वाढवण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचा आहारात समावेश करू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 08:38 AM2023-12-01T08:38:00+5:302023-12-01T08:40:01+5:30

Top Six Health benefits of Eating Peanuts in Winter (Shengdane Khanyche Fayde) : प्रोटीन्स मांसपेशींच्या विकासातही मदत करतात.  मसल्स वाढवण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचा आहारात समावेश करू शकता. 

Top Six Health benefits of Eating Peanuts in Winter Control and Glowing Skin | प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

हिवाळ्याच्या दिवसांत शेंगदाणे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. (Winter Care Tips) कारण या दिवसांत शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. शेंगदाणे खाल्ल्यास  शरीरात उष्णता टिकून राहण्यास मदत होते. (Health tips) यात अनेक पोषक तत्व मिनरल्स आणि व्हिटामीन्स असतात. (Shengdana Khanyache Fayde) फायबर्स,  व्हिटामीन ई, प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स कॅल्शियम आणि फॉलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरेस इत्यादी पोषक तत्व असतात. (Top Six Health benefits of Eating Peanuts in Winter) न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याबाबत अधिक माहिती दिली आहे. यात  त्यांनी शेंगदाणे खाण्याचे फायदे सांगितले आहेत. (Benefits of eating peanuts in winter)

1) शेंगदाण्यात अर्जिनिन नावाचे प्रोटीन असते. यात शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व असतात. प्रोटीन्स एंजाईम्स, हॉर्मोन्स, ब्लड, स्किन, हेअर आणि नखांसाठी फायदेशीर ठरते. प्रोटीन्स मांसपेशींच्या विकासातही मदत करतात.  मसल्स वाढवण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचा आहारात समावेश करू शकता. 

2) शेंगदाणे  मोनोअनसॅच्युरेडेट फॅट एक प्रकारचे हॉर्मोन उत्तेजित करते. म्हणूनच शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेचच तुम्हाला संतुष्ट वाटते. शेंगदाणे खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते. 

3) व्हिटामीन बी-३ आणि नियासिनमुळे सुरकुत्या येत नाहीत. सुरकुत्या,  हायपरपिग्मेंटेड स्किन लाईट होण्यास मदत होते. योग्य प्रमाणात शेंगदाण्याचे सेवन केल्यास त्वचा उजळते.  हिवाळ्याच्या  दिवसांत त्वचा फाटू लागते तेव्हा तुम्ही पिनट ऑईलचा वापर करू शकता. 

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन घटतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर खाऊन वेट कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं  

4) शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. ज्यामुळे मांसपेशींना आराम मिळतो. मसल्स मजबूत होतात. फिजिकल एक्टिव्हीजनंतर रिकव्हर होण्यास मदत होते. हिवाळ्यात जास्तीत जास्त शेंगदाणे खायला हवेत. 

5) शेंगदाण्यांमध्ये नियासिन, रेस्वेराट्रोल, व्हिाटामीन ई  चे प्रमाण जास्त असते. यामुळे अल्जायमर आणि वयाशी संबंधीत आजार उद्भवत नाहीत. वाढत्या वयात मेमरी कमकुवत होण्याचे त्रास उद्भवत नाहीत. 

हाडांना लोखंडासारखं बळकट बनतात हे ८ पदार्थ; रोज खा-कॅल्शियम भरपूर वाढेल, फिट राहाल

6) फोलेट एक महत्वपूर्ण तत्व आहे जे प्रेग्नंसीमध्ये गर्भवती महिलांसाठी गरजेच असते. फॉलेट शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असते.  म्हणून गरोदर महिलांनी याचे सेवन करायला हवे.

सकाळच्या नाश्त्याला पोह्यांमध्ये तुम्ही भरपूर शेंगदाणे घालू शकता. यामुळे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघेल. याशिवाय शेंगदाण्यांची चटणी, पिनट बटर, शेंगदाण्याचे लाडू, शेंगदाणा चिक्की या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

Web Title: Top Six Health benefits of Eating Peanuts in Winter Control and Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.