Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं तर प्या १ खास-पारंपरिक सरबत, डायबिटीस कोलेस्टेरॉलही राहील नियंत्रणात

वजन कमी करायचं तर प्या १ खास-पारंपरिक सरबत, डायबिटीस कोलेस्टेरॉलही राहील नियंत्रणात

Traditional Juice Recipe For Weight loss Diabetic Cholesterol : पारंपरिक गोष्टींना पुन्हा एकदा महत्त्व यायला लागले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 01:38 PM2023-02-15T13:38:57+5:302023-02-15T13:42:03+5:30

Traditional Juice Recipe For Weight loss Diabetic Cholesterol : पारंपरिक गोष्टींना पुन्हा एकदा महत्त्व यायला लागले आहे.

Traditional Satu Juice Recipe For Weight loss Diabetic Cholesterol : If you want to lose weight, drink 1 special traditional syrup, diabetes and cholesterol will also be under control | वजन कमी करायचं तर प्या १ खास-पारंपरिक सरबत, डायबिटीस कोलेस्टेरॉलही राहील नियंत्रणात

वजन कमी करायचं तर प्या १ खास-पारंपरिक सरबत, डायबिटीस कोलेस्टेरॉलही राहील नियंत्रणात

वजन कमी करणं, डायबिटीस नियंत्रणात ठेवणं आणि कोलेस्टेरॉलची पातळी घटवणं ही सध्या अनेकांपुढील महत्त्वाची आव्हानं असल्याचं दिसतं. कामाचा ताण, बैठी जीवनशैली, व्यायामाला नसलेला वेळ आणि खाण्यापिण्याच्या पद्धती यांमुळे आरोग्याच्या या समस्या सर्वच वयोगटात मोठ्या प्रमाणात वाढतात. पण वेळीच त्या नियंत्रणात ठेवल्या तर ठिक नाहीतर हे त्रास भविष्यात वाढत जातात. वजन कमी करायचं म्हणून व्यायाम तर करायलाच हवा. पण आहाराचं तंत्रही पाळायला हवं. ठराविक वेळेत शरीराला पुरेसं पोषण देणाार योग्य प्रमाणातील आणि घरी तयार केलेला आहार घेतला तर आपली वजन वाढण्याची समस्या नक्कीच नियंत्रणात राहू शकते (Traditional Satu Juice Recipe For Weight loss Diabetic Cholesterol). 

आपण दिवसभरात नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण अशा ३ टप्प्यात आहार घेतो. हा आहार पुरेसा पौष्टीक असेल तर उत्तम अन्यथा आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात. बरेचदा आहारतज्ज्ञही आपली आजी, आई जे खात होती किंवा खाते तो आहार सर्वात उत्तम आहार असतो असे आवर्जून सांगतात. म्हणूनच गेल्या काही वर्षात पारंपरिक गोष्टींना पुन्हा एकदा महत्त्व यायला लागले आहे. सातू हे असेच एक अतिशय पौष्टीक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असणारे पीठ. लहान मुलांना किंवा ज्येष्ठ व्यक्तींना आपण आवर्जून सातूचे पीठ देतो. हेच सातूचे पीठ आपणही आहारात घ्यायला हवे. 

फायदे 

१. झटपट ऊर्जा मिळण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी सातूचे पीठ फायदेशीर असते. 

२. सातू म्हणजे फुटाणे किंवा चण्याचे पीठ असल्याने ते पचायला हलके असून भरपूर पोषण देणारे असते. तसेच लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने संथ गतीने पचते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांसाठीही सातू उपयुक्त असते. 

३. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे सारखी भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास शक्यतो सकाळी सातूचे पीठ घ्यायला हवे. 

४. १०० ग्रॅम सातूच्या पीठात २० ग्रॅम प्रोटीन असते. त्यामुळे स्नायू बळकट होण्यासाठीही हे पीठ उपयुक्त ठरते. हाडं मजबूत राहावीत यासाठीही हे पीठ फायदेशीर असते. 

५. सातूमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखे आरोग्याला उपयुक्त घटक असतात. त्यामुळे शरीराचे पोषण होण्यासाठी सर्वच वयोगटातील लोकांसाठी सातू उपयुक्त ठरतो. शरीरातील उष्णता कमी करुन पचनक्रिया सुधारण्यासाठी सातूचं पीठ खाल्लं जातं. 

सातू ड्रींक करण्याची सोपी रेसिपी...

१. एका पॅनमध्ये बार्ली आणि चणे चांगले भाजून घ्यावेत आणि मिक्सरवर त्याचे बारीक पीठ करावे. 

२. ग्लासमध्ये २ ते ३ चमचे सातूचे पीठ घ्यावे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, जीरपूड आणि चिमूटभर साखर घालून एकजीव करावे.

३. आवडत असेल तर लिंबाचा रस, हिरवी मिरची आणि पुदीना घालून हे सरबत प्यावे. 

Web Title: Traditional Satu Juice Recipe For Weight loss Diabetic Cholesterol : If you want to lose weight, drink 1 special traditional syrup, diabetes and cholesterol will also be under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.