वाढते वजन ही चिंता आजकाल सगळ्याच वयोगटांतील लोकांना सतावते. वाढते वजन व शरीराची जाडी, वाढलेलं पोट बघून आपण ते कमी करण्याच्या मागे लागतो. वाढलेलं वजन कमी करुन फिट अँड फाईन दिसावं असं प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. वाढते वजन कमी करण्यासाठी आपण डाएट, जिमिंग, योगा, एक्सरसाइज अशा अनेक पर्यायांचा वापर करुन बघतो. वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज सोबतच डाएट (What is the Morning Banana Diet and how effective is it?) व आहाराकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे असते(What is the morning banana diet trend?)
सध्याच्या बदलत्या काळानुसार डाएटचे अनेक प्रकार आपण बघतो. अमुक एका सेलिब्रिटीने असे डाएट करुन आपले वजन कमी केले, किंवा आपल्या जवळच्या ओळखीच्या व्यक्तींपैकी अमुक - तमुक डाएट करून वजन कमी केले असे ऐकून आपणसुद्धा तो डाएट प्रकार फॉलो करतो. सध्या अशाच एका डाएटची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. आताच्या ट्रेंडनुसार जगभरात 'मॉर्निंग बनाना डाएट' (Morning Banana Diet)ची खूप चर्चा होत आहे. जपानमधून (Is the well-known Japanese diet known as the “morning banana diet” a useful way to lose weight?) सुरू झालेल्या या खास डाएट प्रकारामध्ये लोक भरपूर प्रमाणांत केळी खातात. असे मानले जाते की हे डाएट वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. आता हा ट्रेंड भारतातही येऊ घातला आहे. आपल्याकडेही लोक या डाएटला फॉलो करु लागले आहेत. चला जाणून घेऊया हा आहार कोणता आहे आणि तो शरीरासाठी किती फायदेशीर आहे(Weight loss: Try this Japanese morning banana diet to lose weight faster!).
'मॉर्निंग बनाना डाएट' हा नेमका काय प्रकार आहे ?
आपले आरोग्य चांगले रहाण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या डाएटचे पालन करतो. काही लोकांना पोटावरील हट्टी चरबी कमी करण्यासाठी केवळ लिक्विड डाएट घेणे आवडते, तर बरेच लोक कमीत कमी अन्न खाऊन सॅलडद्वारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. वेळोवेळी, वजन कमी करण्याचे नवीन ट्रेंड देखील चर्चेचा विषय बनतात. वजन कमी करण्यासाठी एक नवीन डाएटचा प्रकार जगभरात लोकप्रिय होत आहे, ज्याला 'मॉर्निंग बनाना डाएट' असे म्हणतात. या डाएट प्रकाराची सुरुवात जपानमध्ये झाली आणि अनेक देशांमध्ये हा डाएट प्रकार हळुहळु लोकप्रिय होत आहे. वजन कमी करण्याचा हा सर्वोत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे.
उपवास करुन वजन कमी करायचं मग खा भरपूर शिंगाडा, शिंगाड्याची फळं म्हणजे तर तब्येतीसाठी वरदान...
वजन कमी करायचे म्हणून नाश्ता करताना करू नका २ चुका, वजनापायी जीवावर बेतेल...
वेबएमडीच्या रिपोर्टनुसार, या डाएट प्रकारामध्ये सकाळच्या ब्रेकफास्टच्यावेळी केळी खाऊन लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. नाश्त्यात ३ ते ४ केळी आपण खाऊ शकता. जर तुमचं पोट भरत नसेल तर तुम्ही जास्त केळी देखील खाऊ शकता. यांसोबतच केळी खाताना रूम टेम्परेचरला असणारे म्हणजेच साधे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय हा डाएट फॉलो करणारे लोक दुपारी आणि रात्री संतुलित आहार घेतात.
या डाएट प्रकारांत, आपण दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी आपले आवडते अन्नपदार्थ खाऊ शकता, परंतु आपले पोट ८० % भरल्यानंतर पुढे काहीही न खाण्याचा सल्ला दिला जातो. या डाएट प्रकारांत रात्रीचे जेवण लवकर करण्याचा नियम आहे, याचबरोबर रात्री ८ नंतर नाश्ता करण्यास मनाई आहे. या डाएट प्रकारांत, जेवणानंतर मिठाई खाण्यास मनाई आहे. दिवसभरात दुग्धजन्य पदार्थ, अल्कोहोल आणि कॅफिन असलेले अन्नपदार्थ किंवा ड्रिंक्स खाण्या - पिण्यास मनाई आहे.
वजन कमी करता करता केसांना गळती लागली ? ५ सोप्या टिप्स, केस गळणं बंद...
'मॉर्निंग बनाना डाएट' अंतर्गत लोकांना झोपेला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून शरीराला पुरेशी विश्रांती मिळू शकेल. या डाएटमध्ये लोक दिवसभर भरपूर पाणी पितात. आता प्रश्न असा आहे की वजन कमी करण्यासाठी ही योग्य पद्धत आहे का ? या संदर्भात, पोषण तज्ज्ञांचे मत आहे की या डाएटचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीसाठी भिन्न असू शकतो.
वजन वाढते कारण रात्री जेवणानंतर तुम्ही करता ३ चुका, तब्येतीचे बिघडते तंत्र...
तज्ज्ञांच्या मते नाश्त्यात फक्त केळी खाल्ल्याने शरीरात आवश्यक प्रथिने आणि इतर पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी फक्त केळी खाण्याव्यतिरिक्त, आपण विविध प्रकारची फळे, भाज्या आणि कडधान्य, भरड धान्य यांचा आपल्या डाएटमध्ये समावेश केला पाहिजे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार असणाऱ्या डाएटसोबतच, चांगली लाईफस्टाईल आणि फिजिकल अॅक्टिव्हिटी अधिक फायदेशीर ठरू शकते.