Join us  

हळदीचं दूध चांगलं पण हे ५ त्रास असतील तर चुकूनही पिऊ नका हळदीचं दूध, तब्येत खराब होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 6:55 PM

Turmeric Milk Can Be Harmful For These People : हळदीत एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटीइंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे संक्रमणाशी लढण्यास मदत होते.

औषधी गुणांनी परिपूर्ण  हळदीच्या दुधाचे सेवन केल्यानं शरीरावर चांगला परिणाम होतो. पण हिवाळ्याच्या दिवसांत हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हे एक नॅच्युरल ड्रिंक आहे जे पिऊन तुम्ही इम्यूनिटी वाढवू शकता. हळदीच्या गुणांना आयुर्वेदात औषधाप्रमाणे मानले गेले आहे (Turmeric Milk). रोज हे दूध प्यायल्यानं सर्दी, खोकल्याचा त्रास होत नाही.

हळदीत एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटीइंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे संक्रमणाशी लढण्यास मदत होते. पण  काही लोकांसाठी हळदीचं दूध पिणं हानीकारक ठरू शकतं.  गोल्डन मिल्कचा आहारात समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला  हवा. (Turmeric Milk Can Be Harmful For These People Should Avoid Drinking Turmeric Milk)

प्रेग्नंसीत हळदीचं दूध पिणं टाळा

हळदीचं दूध शरीरासाठी गरम असते. म्हणून प्रेग्नंसीत महिलांनी या दूधाचे सेवन करू नये. अन्यथा पोटदुखी, भिती वाटणं यांसारख्या समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त  जे लोक गरजेपेक्षा जास्त हळदीचं दूध पितात त्यांना रॅश, जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात. 

गट हेल्थवर परिणाम

हळदीचं दूध प्यायल्यानं तुमच्या गट्स हेल्थवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असतील तर हळदीचं दूध पिणं टाळा.  गरजेपेक्षा जास्त हळदीचं दूध प्यायल्यानं उलटी, मळमळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 

 एकादशीला करा अजिबात तेल न पिणारे साबुदाणे वडे-तेलात फुटणार नाहीत-सोपी रेसिपी

लिव्हरशी संबंधित समस्या

जर तुम्हाला लिव्हरशी संबंधित कोणत्याही समस्या असतील तर हळदीचं दूध पिणं टाळायला हवं. अन्यथा त्रास अधिक वाढू शकतो. कोणत्याही वस्तूचे अतिसेवन तब्येतीसाठी नुकसानकारक ठरते. या गुणांनी परिपूर्ण हळदीचे सेवन केल्यास शरीरात आयर्नसारख्या पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. 

एलर्जी

जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त हळदीचे दूध प्यायलात तर स्किन रॅशेस होण्याचा धोका जास्त असतो. काही लोकांना त्वचेवर जळजळ, श्वास घ्यायला त्रास अशा समस्या उद्भवतात.

ओटी पोट थुलथुलीत दिसतंय? संध्याकाळी नाश्त्याला 'हा' पांढरा पदार्थ खा; महिन्याभरातच पोट सपाट

आयर्नची कमतरता

ज्या लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता आहे त्यांनी गरजेपेक्षा जास्त हळद खाणं टाळायला हवं. हळदीचं दूध जास्त प्रमाणात प्यायल्यास त्यांच्या शरीरात आयर्न कमी होण्याची समस्या उद्भवू शकते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य