मॉर्निंग वॉक (Morning Walk) फिटनेसचा शॉर्टकट आहे. जर तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी फार वेळ नसेल तर सकाळी थोडा वेळ काढून तुम्ही चालण्याला रोजच्या आयुष्याचा एक भाग बनवू शकता. सकाळच्या वॉकनं दिवसाची सुरूवात ताजीतवानी आणि पॉझिटिव्ह होईल. नियमित वॉक केल्यानं फक्त वजन नियंत्रणात राहणार नाहीतर हृदय, मांसपेशी, हाडंसुद्धा चांगली राहतील. मॉर्निंग वॉकमुळे चिंता, ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. (Type Of Morning Walk And There Health Benefits)
यामुळे एंडोर्फिन नावाचा हॅप्पी हॉर्मोन वाढवण्यास मदत होते ज्यामुळे मन शांत राहतं. जे लोक नियमित वॉक करतात त्यांना चांगली झोप येते. मॉर्निंग वॉक केल्यानं कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे हृदयाच्या आजारांचाही धोका टळतो.
१) नॉर्डीक वॉक
हा वॉक विशेष स्टिक्ससोबत केला जातो. जे स्किईंग टेक्निकप्रमाणे असते यात हात आणि पाय दोन्ही एक्टिव्ह असतात ज्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. शरीराच्या ८० टक्के मांसपेशी एक्टिव्ह होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. सामान्य वॉकच्या तुलनेत २० ते ४० टक्के जास्त कॅलरीज बर्न होतात. सांध्यांवर कमी दबाव पडतो.
२) ब्रिस्क वॉक
ब्रिस्क वॉक केल्यानं हार्ट आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारते, ब्रिस्क वॉक वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत करतो. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. शरीराला एनर्जी मिळते थकवा दूर होतो.
३) मेडीटेटिव्ह वॉक
मेडिटेटिव्ह वॉक केल्यानं फिजिकल वॉकबरोबरच मानसिक ताण कमी होतो आणि लक्ष केंद्रीत होते. हा वॉक करताना हळूहळू चालायचे आणि श्वास आणि पाऊलांवर लक्ष देऊन चालावे ही एक सोपी पद्धत आहे. हा वॉक करण्यासाठी शांत जागेची निवड करा, संथ गतीने चाला, पाऊलांवर लक्ष द्या. चालताना चारही बाजूंचे वातावरण फिल करा, १० ते १५ मिनिटं वॉक करा नंतर हळूहळू वेग वाढवा.