Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Food fact : हे पदार्थ कधीही एकत्र, एकावेळी खाऊ नका, पचनावर होतील विपरीत परिणाम

Food fact : हे पदार्थ कधीही एकत्र, एकावेळी खाऊ नका, पचनावर होतील विपरीत परिणाम

प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे कधीही दोन विरूद्ध गुणधर्मीय अन्नपदार्थ एकत्र करून खाऊ नये. त्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 06:08 PM2021-08-03T18:08:22+5:302021-08-03T18:09:32+5:30

प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे कधीही दोन विरूद्ध गुणधर्मीय अन्नपदार्थ एकत्र करून खाऊ नये. त्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.

Unhealthy food combinations that should avoid, harmful for health | Food fact : हे पदार्थ कधीही एकत्र, एकावेळी खाऊ नका, पचनावर होतील विपरीत परिणाम

Food fact : हे पदार्थ कधीही एकत्र, एकावेळी खाऊ नका, पचनावर होतील विपरीत परिणाम

Highlightsविरूद्ध अन्नाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात अनेक सुक्ष्म बदल होत जातात, जे भविष्यातील भयंकर आजारांसाठी कारणीभूत ठरतात.

दूधात केळी कुस्करून आणि त्यात साखर टाकून कालवलेले शिकरण म्हणजे बहुतांश लोकांचा आवडता पदार्थ. पण आयुर्वेदानुसार दूध आणि फळे एकत्र करून खाणे वर्ज्य सांगितलेले आहे. विरूद्ध अन्न नावाची संकल्पना आपल्याला माहिती असते. घरातल्या मोठ्या लोकांकडून आपण त्याबद्दल अनेकदा ऐकलेलं असतं. पण असं विरूद्ध अन्न खाऊ नये, म्हणजे नेमकं काय खाऊ नये, हेच आपल्याला कळत नाही. म्हणून तर इथे विरूद्ध अन्नाचे काही प्रकार दिले आहेत. तसे food combinations जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात खात असाल, तर लगेच ही सवय सोडून द्या. कारण याचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात. 

 

विरूद्ध अन्न खाल्ल्यामुळे प्रत्येकालाच लक्षणीय त्रास जाणवेल असे काही नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्रास होण्याचे प्रमाण कमी- अधिक असू शकते. बऱ्याचदा विरूद्ध अन्न आपण खातो. खाल्ल्यावर काही त्रास जाणवत नाही. त्यामुळे असे पदार्थ नेहमीच खाण्यास काही हरकत नाही, असे आपल्याला वाटते. पण हे चुकीचे आहे. विरूद्ध अन्नाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात अनेक सुक्ष्म बदल होत जातात, जे भविष्यातील भयंकर आजारांसाठी कारणीभूत ठरतात.

विरूद्ध अन्न खाल्ल्यामुळे होणारा त्रास
केस गळणे, पोट बिघडणे, ॲसिडीटी, सर्दी, वजन वाढणे किंवा खूप खाऊनही वजनच न वाढणे, त्वचेवर फोडं येणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, खूप झोप येणे किंवा झोपच न येणे, कायम सुस्ती येणे, कोणत्याच कामाचा उत्साह नसणे.

 

असे पदार्थ खाणे टाळा
१. दूध आणि फळे

आयुर्वेदानुसार दूध आणि केळी हे पदार्थ एकत्र करून खाणे अतिशय चुकीचे सांगितले आहे. तसेच दुधासोबत कोणतेही आंबट फळ खाऊ नये. दूध आणि फळे या दोघांचेही गुणधर्म वेगवेगळे असतात आणि त्यांना पचनासाठी वेगवेगळा वेळ लागतो. जर हे पदार्थ एकत्र करून नेहमीच खाल्ले गेले, तर पोटाचे विकार जडू शकतात.

२. दूध आणि भाज्या
दूधासोबत कच्चा कांदा, अंडी, मांसाहार, मुळा, फणस असे पदार्थ कधीच खाऊ नयेत. यामुळे त्वचाविकार होतात.

 

३. दही आणि फळे :

दह्यासोबत कधीच कोणते फळ खाऊ नये. यामुळे कफ वाढतो. दही आणि उडीद हे पदार्थ देखील एकत्र खाऊ नयेत. यामुळे रक्तदाब वाढणे, हृदयविकार होणे असे त्रास होतात. त्यामुळे दहीवडे हा पदार्थ देखील आरोग्यासाठी चांगला नाही. वर्षातून एक- दोन वेळेस खाल्ला तर हरकत नाही. पण दहीवड्यांचा अतिरेक टाळावा.

४. तूप आणि तांब्याचे भांडे:

तूपाचे अनेक गुणधर्म आहेत. प्रकृतीसाठी आणि सौंदर्यासाठी तर तुप म्हणजे वरदान आहे. पण हेच तूप जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात ठेवले, तर मात्र आरोग्यावर सगळेच विपरित परिणाम होतात. त्यामुळे तूप तांब्याच्या भांड्यात कधीच ठेवू नये. 

 

५. बर्गर आणि फ्रेंच फ्राईज
कधीही आऊटिंगला गेलो, की हे दोन पदार्थ हमखास घेतले जातात. पण हे दोन पदार्थ एकाचवेळी खाणे अत्यंत चुकीचे आहे. बर्गर आणि फ्रेंच फ्राईज या दोन्ही पदार्थात खूप जास्त फॅट्स असतात. जर हे दोन्ही पदार्थ एकावेळी खाल्ले तर शरीराला ते पचविणे खूप कठीण होते. खूप सुस्ती येते आणि आळस येतो. त्यामुळे कधीही हे दोन पदार्थ एकाचवेळी खाऊ नका.

 

६. पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्स
आजच्या यंगस्टरचं हे एक अत्यंत आवडीचं कॉम्बिनेशन. पिझ्झा मागवला की त्यासोबत कोल्ड्रिंक्स मागवणं आजकाल खूपच नॉर्मल आणि 'मस्ट डू' झालं आहे. पण हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्याची चूक टाका. कारण पिझ्झा हा पचण्यासाठी खूप जड असतो. पिझ्झा पचवायला आपली सगळी पचनसंस्था ॲक्टिव्ह होते आणि कोल्ड्रिंक्स प्रचंड वेगात ॲक्टिव्ह झालेल्या पचनसंस्थेला तेवढ्याच वेगाने स्लो करून टाकते. त्यामुळे या कॉम्बिनेशनचा पचनावर खूपच भयानक परिणाम होतो. 

 

Web Title: Unhealthy food combinations that should avoid, harmful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.