हल्ली जवळपास सगळ्याच जणांचं रुटीन खूप बदललं आहे. व्यायाम करायला अनेकांना वेळ नाही. किंवा काही जणांना वेळ असतो पण त्यांना व्यायामाचा प्रचंड कंटाळा येतो.. त्यात खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा खूप बदलल्या आहेत. आहारात जंकफूड, मैद्याचे पदार्थ, साखरयुक्त पदार्थ खूप वाढले आहेत. त्यामुळे मग पचनाच्या समस्या निर्माण होतात. पचनक्रिया, चयापचय क्रिया दोन्ही बिघडले की मग शरीरावरची चरबी वाढत जाते. आणि विशेषत: पोटावरच्या चरबीचा घेर वाढायला सुरुवात होते. काही जणांच्या बाबतीत तर हात- पाय अगदी प्रमाणशीर असतात. पण पोटावरची चरबी सुटायला मात्र सुरुवात झालेली असते (simple home remedies to reduce belly fat). तुमचंही असंच झालं असेल तर नेमका काय उपाय करायचा ते आता पाहूया..(how to get rid of belly fat?)
पोटावरची चरबी कमी करण्याचा घरगुती उपाय
पोटावरची चरबी कमी करायची असेल तर मिरे तुमच्या आहारात नियमितपणे असायला हवे असं एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडीसिन या अमेरिकन संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार मिऱ्यांमध्ये पाईपरिन (piperine) हा एक कंपाउंड असतो.
दहीदुधाचा वापर करून बघा कशी घ्यायची त्वचेची काळजी! ग्लोईंग त्वचेसाठी स्वस्तात मस्त ट्रिक्स..
हा घटक वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. कारण या पदार्थामुळे शरीरातील चयापचय क्रिया अधिक जलद होते. जर चयापचय क्रिया उत्तम असेल तर शरीरावर चरबी साचून राहण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते.
तसेच या अभ्यासानुसार असेही सांगण्यात आले आहे की शरीरावर असलेले फॅट्स ब्रेकडाऊन करण्यासाठीही पाईपरिन हा घटक उपयुक्त ठरतो.
गॅस शेगडीचं काळंकुट्टं झालेलं बर्नर एका मिनिटांत होईल चकाचक, 'हा' पदार्थ घेऊन करा स्वच्छता
तसेच पाईपरिनमुळे शरीरावर अतिरिक्त फॅट्स नव्याने तयार होण्याची प्रक्रियाही बरीच हळूवार होत जाते. त्यामुळे पोटावरची चरबी कमी हाेण्यासाठी मिरे नियमितपणे खावेत. तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून मिरे खाऊ शकता. किंवा सलाड, रायते अशा पदार्थांवर मिरेपूड टाकून खाऊ शकता. मिऱ्याचा चहा नियमितपणे घेणेही वजन कमी करण्यासाठी फायद्याचे ठरू शकते.