Join us  

Use of wala root or khus: डोक्यातल्या कोंड्यापासून ते पीसीओएसपर्यंत ५ समस्यांवर एक उपाय, उन्हाळ्यात आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 6:30 PM

Benefits of Wala Root or Khus Water: शरीराला अनेक फायदे मिळवून देण्यासह त्वचा आणि केस (skin and hair problem) यांच्यासाठीही पोषक ठरणारा हा बघा एक खास उपाय (vetiver water)... 

ठळक मुद्देहा तर आपला पारंपरिक उपाय. पण आपण मात्र तो आता विसरलो आहोत. त्याचीच ऋजुता यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.

उन्हाळ्यात आपल्याला अनेक समस्या जाणवतात. खूप घाम येतो, डोक्याची त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे कोंडा (dandruff) ही खूप होतो. त्याचबरोबर डिहायड्रेशनचा (dehydration) त्रासही जाणवत असतो. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक जणांना बद्धकोष्ठतेचा (constipation) त्रासही जाणवतो. उष्णतेमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर फोडंही (pimples) येतात.. असे अनेक त्रास कमी करण्यासाठी तसेच शरीराला थंडावा मिळावा, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारावे, यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

 

त्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक माहिती शेअर (instagram share) केली आहे. यामध्ये त्यांनी वाळा म्हणजेच खस किंवा vetiver शरीरासाठी कसं लाभदायक आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वाळा टाकून पाणी पिणं हा तर आपला पारंपरिक उपाय. पण आपण मात्र तो आता विसरलो आहोत. त्याचीच ऋजुता यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. त्या म्हणतात की डोक्यातल्या कोंड्यापासून ते अगदी बऱ्याच महिलांना जाणवणारा पीसीओएस त्रास कमी करण्यापर्यंत अनेक बाबतीत वाळ्याचं पाणी अतिशय गुणकारी ठरतं.

 

वाळ्याचं पाणी प्यायल्याने होणारे लाभ (Benefits of wala or Khus water)- उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने हनुवटी आणि त्याच्या आसपासच्या भागात बारीक पुटकुळ्या येतात. हा त्रास कमी करण्यासाठी वाळ्याचे पाणी पिणे उपयुक्त ठरते.- केसांचं गळणं कमी करण्यासाठी फायदेशीर- डोक्यात खूप खाज येत असेल आणि खाजवल्यावर प्रत्येकवेळी कोंडा निघत असेल तर हा त्रासही वाळ्याच्या पाण्याने कमी होतो.- पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी उपयुक्त- उन्हाळ्यात खूप घाम येऊन शरीराची दुर्गंधी (body odour) येत असल्यास वाळ्याचे पाणी फायदेशीर ठरते. 

 

कसा करायचा वाळ्याचा उपयोग?- उन्हाळ्यात माठामध्ये पाणी भरून ठेवा आणि त्यात वाळ्याच्या १५ ते २० काड्या टाका. एक- दोन तासांतच पाण्यामध्ये वाळ्याचा अर्क उतरतो आणि त्याचा छान सुवास येऊ लागतो. सलग ३ दिवस या काड्या माठात राहिल्या तरी चालतात. ३ दिवसांनंतर या काड्या माठातून बाहेर काढा. कडक उन्हात पुर्णपणे वाळू द्या. त्यानंतर सुकल्या की पुन्हा माठात टाका आणि पुढचे ३ दिवस तुम्ही त्या वापरू शकता.- तुमच्याकडे माठ नसेल तर ज्यात पाणी भरून ठेवता त्यात थोड्या काड्या टाकून ठेवा.

 

आंघोळीसाठी वाळ्याचे पाणी- माठात टाकलेल्या वाळ्याच्या काड्या वरील पद्धतीनुसार एकूण ६ दिवस वापरल्या की त्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा. शरीराचा दुर्गंध कमी होतो. - पुर्णपणे वाळ्याच्या पाण्याने आंघोळ नको असेल तर एक बादली भरून त्यात वाळा टाकून ठेवा. आंघोळ झाली की शेवटी फक्त वाळ्याच्या पाण्याचे दोन मग अंगावर घ्या. एक वेगळाच फ्रेशनेस दिवसभर जाणवेल.- वाळ्याचा एक गोलाकार बॉल किंवा वडी तयार करा आणि ते आंघोळीच्या वेळी अंगावर घासून त्याचा स्क्रबप्रमाणे वापर करा. यामुळेही त्वचा स्वच्छ होते आणि अंगाची दुर्गंधी जाते. 

 

 

टॅग्स :समर स्पेशलत्वचेची काळजीकेसांची काळजीइन्स्टाग्रामपाणी