जेव्हा मसल्स वाढवण्याचा विषय येतो तेव्हा नॉनव्हेज खाण्यावर जास्त भर दिला जातो. विगन डाएटचा आधार घेऊन मांसपेशींचा विकास करणं खूप कठीण असते. व्हेज फूडमध्ये असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. (Foods List For Muscles Gain) रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करून तुम्ही शरीरातील प्रोटीन्सनची कमतरता भरून काढू शकता. (5 Best Protein Sources For Vegan And Vegetarians)
इटींगवेलच्या रिपोर्टनुसार शाकाहारी प्रथिनांच्या यादीत काही पदार्थांचा समावेश आहे. ज्यात ग्रीक योगर्ट, चिया सिड्स, क्विनोआ, कॉटेज चिझ, बीन्स, ग्रीन पिस, बदाम यांचा समावेश असतो. एक कप ग्रीक योगर्टमध्ये २३ ग्रॅम प्रोटीन्स असतात, १ टेबलस्पून चिया सिड्समध्ये, १ कप मटारमध्ये ८ ग्रॅम प्रोटीन असते. (Best Protein Sources for Vegans and Vegetarians)
१) स्पिरूलिना
स्पिरूलिना प्रोटीन्सचा एक उत्तम पर्याय आहे. यात ७० टक्के अधिक प्रोटीन असते. याचा अर्थ असा की मांस आणि डेअरीच्या तुलनेत अधिक प्रोटीन्स असते. स्पिरूलिना पावडर स्मूदी आणि डिशच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता.
२) पीनट बटर
पीनट बटर तब्येतीसाठी उत्तम ठरते. पीनट बटर प्रोटीन्सनी परिपूर्ण असते. प्रति १०० ग्राम पीनट बटरमध्ये जवळपास २५ ग्राम प्रोटीन असते. सोयाबीन, राजमा, मटार, डाळी, मूगडाळ आणि छोले प्रति १०० ग्राम २० ते २५ ग्राम प्रोटीन असते.
पोट सुटलंय, मांड्यांचा शेप बिघडला? १० दिवस सकाळी हे पाणी प्या, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल
३) बीन्स
प्रोटीन बीन्स, शेंगा यात फायबर्स असतात. (Beans) आतड्यांची चरबी कमी होण्यासाठी फायदेशीर, प्रभावी ठरतात. रोजच्या जेवणात डाळींचा समावेश करून तुम्ही प्रोटीन्स मिळवू शकतात. १०० ग्राममध्ये जवळपास १३ ग्राम प्रोटीन्स असतात. सोया मिल्क, एक चमचा पीनर बटर, मूठ शेंगदाणे प्रोटीन बुस्टरचे काम करतात.
४) भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बीया मॅग्नेशियम, आयर्न आणि प्रोटीन्सचा स्त्रोत आहे. अर्धा कप भोपळ्याच्या बियांमध्ये १६ ग्राम प्रोटीन असते. रोजच्या नाश्त्याला किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यास तुम्ही भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता.
थंडीत स्किन काळवंडली-ड्राय झाली? १ बोरोलिन 5 फायदे-चेहऱ्यावर येईल तेज, डार्क सर्कल्स दूर
५) पालक
एक कप चिरलेल्या पालकमध्ये ५ ग्राम प्रोटीन्स असतात. यात आयर्नचे प्रमाणही असते. ज्यामुळे हाडं आणि डोळे चांगले राहण्यास मदत होते. याशिवाय कॅल्शियमचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे.