सध्याच्या धावपळीच्या काळात सगळ्यांनाच फिट असावे असे वाटत असते. फिट असण्याची अशी कितीही इच्छा असली तरीही रोजचे धकाधकीचे जीवन, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार यामुळे वजन वाढतच जाते. दिवसेंदिवस असे वाढते वजन कमी करण्यासाठी बरेचजण अनेक प्रकारच्या डाएटचा आधार घेतात. डाएट सुरु करताना काहीजण कशाचाही विचार न करता लगेच डाएट सुरु करतात. काहीवेळा कोणी तोंडी सांगितलेले किंवा कुणाला डाएटचा फरक पडला असेल असे डाएट, कुठेतरी वाचलेले किंवा एखाद्या बड्या सेलिब्रिटीने फॉलो केलेले असे अनेक डाएट आपण पाळायला सुरु करतो. हे डाएट करण्याचा काही आगा - पिछा माहित नसतो तरीही अगदी बेधडकपणे आपण आपल्या शरीराचा विचार न करता ते करायला सुरुवातही करतो.
काहीवेळा आपण लगेच बारीक होण्याच्या हव्यासापायी नको नको त्या अघोरी उपायांच्या आहारी जातो. डॉक्टर किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला न घेता डाएट सुरु करतो, असे चुकीचे डाएट फॉलो केल्याने त्याचे आपल्या शरीरावर चांगले परिणाम दिसण्याऐवजी शरीराची आणखीनच हेळसांड केली जाते. त्यामुळे डाएट करा परंतु आपल्या शरीराच्या गरजा, कमतरता ओळखूनच करा. सध्या अशाच एका जीवघेण्या डाएटची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. रशियाची ३९ वर्षीय प्रसिद्ध फूड इन्फ्लुएन्सर झान्ना सॅमसोनोवा (Zhanna Samsonova) हिचा अतिशय काटेकोर आणि कडक डाएटिंग केल्यामुळे मृत्यू झाल्याचे समजते आहे(Vegan Influencer Zhanna Samsonova Dies At 39: Is Vegan Diet All About Starvation, How Unhealthy It Is?).
नेमकं तिने कोणतं डाएट केलं होत फॉलो...
रशियाची प्रसिद्ध फूड इन्फ्लुएन्सर झान्ना सॅमसोनोवा (Zhanna Samsonova) हिचा नुकताच अतिशय कडक डाएट फॉलो केल्याने मृत्यू झाला आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून वेगन डाएट (Vegan Diet) फॉलो करत होती. या डाएटमध्ये ती फक्त न शिजवलेले कच्चे अन्न घेत होती. ती आपल्या डाएटमध्ये फक्त अंकुरलेल्या सूर्यफुलाच्या बिया, फळे आणि कच्च्या भाज्याच खात असल्याचे सामोरे आले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या झान्ना सॅमसोनोव्हाला (Zhanna Samsonova) अनेकजण फॉलो करायचे. तसेच ती आपल्या सोशल मीडियावरून लोकांना देखील कच्चे अन्न खायला सांगायची. झान्ना सॅमसोनोवा फक्त परदेशी फळांवर जगत होती.
झोमॅटोच्या सीईओंनी कमी केलं १५ किलो वजन, काम-स्ट्रेस आणि खाणंपिणं सांभाळत बारीक होण्याची गोष्ट...
आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...
झान्ना अनेकदा सोशल मीडियावर शाकाहारी रॉ फूडची जाहिरात करताना दिसली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, कच्च्या आहारामुळे झान्ना उपासमारीची शिकार झाली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. झान्ना सॅमसोनोवाच्या मित्र - मैत्रिणींनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी श्रीलंका दौऱ्यादरम्यान तिची प्रकृती अधिकच खालावली होती. ती खूप जास्त सुस्त झाली होती. तिचे पाय सुजले होते. तिला उपचारासाठी घरी पाठवण्यात आले होते. मात्र ती पुन्हा तिथून बाहेर पडली होती. जेव्हा ती फुकेतमध्ये होती तेव्हा तिची परिस्थिती आणखीच भयानक झाली होती.
वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...
झान्ना सॅमसोनोवाच्या आईने सांगितले की, कॉलरासारख्या आजाराने तिचा मृत्यू झाला आहे. मात्र तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नाही. परंतु असे वाटते की जास्त थकवा आल्याने आणि पूर्णपणे कच्चे अन्न खाल्ल्याने तिच्या शरीरावर खूप ताण आला होता आणि यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. सॅमसोनोवा फक्त फळे, फळांचा रस, सूर्यफुलाच्या बिया जेवण म्हणून खात होती. सॅमसोनोवाच्या आणखी एका मैत्रिणीने सांगितले की, ती गेल्या सात वर्षांपासून फणस खात होती. सॅमसोनोवाच्या मित्रांच्या मते, तिच्या मृत्यूचे कारण कच्चे अन्न आहे, ज्यामुळे तिचे शरीर फारच अशक्त झाले होते.