Join us  

Top 3 Healthy Soups For Diabetics : शुगर अजिबात वाढणार नाही;  हिवाळ्यात रोज ३ प्रकारचे सूप प्या, डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 12:07 PM

Top 3 Healthy Soups For Diabetics : भाज्यांचे सूप प्यायल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डायबिटीस असलेल्यांना नेहमीच हेल्दी खाण्यापिण्याचा सल्ला दिला जातो. अन्हेल्दी पदार्थांच्या सेवनानं रक्तातील सारखेचं प्रमाण अचानक वाढू शकतं.  खासकरून पॅक फूड, फ्रोजन पदार्थ खाल्ल्यास रक्त्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.  काही पदार्थ डायबिटीसच्या रुग्णांसाठी आरोग्यवर्धक ठरतात. कारण यामुळे तब्येत खराब होण्याचा धोका नसतो. भाज्यांचे सूप प्यायल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. (Vegetarian soup that lower blood sugar level for diabetes mushroom tomato red lentil masoor dal)

टोमॅटो सूप (Tomato Soup)

टोमॅटो सूप तयार करण्यासाठी टोमॅटो सूप, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि एक चमचा लसूण घ्या. आता गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात एक कप पाणी घाला आणि सर्व साहित्य चांगले शिजवा. आता मिश्रण मंद आचेवर शिजवा. नंतर गॅसवरून काढून थंड होण्याची वाट पहा. आता हे मिश्रण मिक्सर ग्राइंडरमध्ये मिसळा. आता पुन्हा एकदा गॅसवर गरम करून त्यात काळे मीठ मिक्स करून एका भांड्यात सर्व्ह करा.

मसूर डाळीचे सूप (Masoor Dal Soup)

तुम्ही मसूरची डाळ अनेक वेळा खाल्ली असेल. मसूर डाळीचे सूपही ट्राय करून पाहा. यासाठी तुम्ही भिजवलेली मसूर, कांदे, गाजर, सिमला मिरची घ्या आणि हे सर्व एका पातेल्यात पाण्यात टाका आणि 10 मिनिटे शिजवा. शेवटी, चवीसाठी ओव्याची पाने घाला. पुर्णपणे गेल्यावर मिक्स करून एका वाडग्यात सर्व्ह करा.

मशरूम सूप (Mashroom Soup)

मशरूम सूप पिऊन रक्तातील साखरेची पातळी कमी करता येते. यासाठी तुम्ही एक कप मशरूम, एक चमचा गव्हाचे पीठ, अर्धा कप लो फॅट दूध, अर्धा कप चिरलेला कांदा, एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घ्या. आता गॅसवर तवा ठेवा आणि मंद आचेवर कांदा परतून घ्या. आता कढईत सर्व साहित्य टाकून अर्धा कप पाणी घाला. कधीकधी 6 ते 7 मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा. आता हे मिश्रण दुधात घालून एकजीव करा. आता एका कढईत तेल टाका आणि हे मिश्रण मंद आचेवर शिजवा आणि एका भांड्यात काढल्यानंतर सर्व्ह करा.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य