वाढत वजन ही आजकाल खूप मोठी आणि सगळ्यात कॉमन समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी आपण डाएट, एक्सरसाइज असे अनेक उपाय करून पाहतो. आपल्यापैकी काहीजणांचे वजन हे लगेच कमी होते तर काहींना वजन कमी करण्यासाठी फार मेहनत करावी लागते. वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे (Virat Kohli Nutritionist Told The Cheapest Way To Lose Weight Shares Free Diet Plan For Quick Weight Loss) ट्रेंड फॉलो करतो. आपल्यापैकी बरेचजण वजन कमी करण्यासाठी मोठमोठ्या सेलिब्रिटीजने किंवा त्यांच्या डाएटिशियनने सांगितलेल्या डाएट टिप्स फॉलो करणे पसंत करतात(Virat Kohli’s Nutritionist Advice For Weightloss).
मोठमोठे सेलिब्रिटीज स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करतात किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतं डाएट करतात ते आपण देखील फॉलो करुन पाहावं अशी उत्सुकता आपल्या मनात कायम असतेच. सगळ्यांचा लाडका किंग कोहली यांचा न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो नेहमीच काही ना काही हेल्थ आणि फिटनेस टिप्स शेअर करत असतो. रयान याने आपल्या युट्युब चॅनेलवरून वजन कमी करण्यासाठी काही सोप्या गोष्टी फॉलो करायला सांगितल्या आहेत त्या नेमक्या कोणत्या ते पाहूयात.
वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ४ सवयी...
१. भरपूर पाणी प्या :- न्यूट्रिशनिस्ट सांगतात, सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी प्यावे. आपण पाणी पिऊन झाल्यावर ग्रीन टी देखील पिऊ शकता. दिवसभरात पुरेसे पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवावे. वजन कमी करण्यासाठी डाएट, एक्सरसाइज सोबतच पाणी पिऊन हायड्रेटेड राहणे देखील तितकेच गरजेचे असते.
ब्रा फॅट्स दिसल्याने शरीर बेढब दिसते? ४ सोपे व्यायाम करतात ब्रा फॅट्स कमी...
२. दुपारच्या जेवणांत करा बदल :- आपल्या दुपारच्या जेवणात थोडा बदल केल्यास वजन कमी होण्यास अधिक मदत होईल. न्यूट्रिशनिस्टच्या सांगण्यानुसार, दुपारच्या जेवणात डाळ आणि भाजीचे प्रमाण दुप्पट करण्याचा सल्ला देतात. दुपारच्या जेवणात तुम्ही नेहमी जितक्या प्रमाणांत भाजी आणि डाळ खाता त्याच्या दुप्पट खा आणि त्याऐवजी भात आणि चपाती कमी प्रमाणांत खा.
वाढते वजन - पोटाची ढेरी होईल कमी, सकाळी उपाशी पोटी खा 'हे' फळं - दिसाल स्लिमट्रिम...
३. रात्रीच्या जेवणाची वेळ पाळा :- रात्रीचे जेवण योग्य वेळेवर घेणे आवश्यक आहे. शक्यतो रात्रीचे जेवण फार उशिरा करु नका. संध्याकाळी सूर्यास्त होण्याआधी रात्रीचे जेवण करून घ्यावे. सूर्यास्त झाल्यानंतर शक्यतो काही खाऊ नये. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कॅमोमाइल टी, ग्रीन टी किंवा कोणत्याही प्रकारची हर्बल टी पिऊ शकता.
४. रात्री झोपण्यापूर्वी करा वॉकिंग :- न्यूट्रिशनिस्ट रयान फर्नांडो यांनी रात्रीच्या जेवणानंतर किमान १५ मिनिटे वॉकिंग करण्यास सांगितले आहे. यामुळे आपण खाल्ले अन्न चांगल्या प्रकारे पचण्यास अधिक मदत होते. जर आपल्या पचन संस्थेचे कार्य सुरळीत असेल तर वजन कमी करण्यास ते अधिक फायदेशीर ठरते.
खरबूज की कलिंगड? वजन कमी करायचं तर उन्हाळ्यात यापैकी कोणतं फळ खाणं जास्त फायद्याचं...