Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भरपूर खा आणि वजन उतरवा! तुम्हाला माहिती आहे का वेटलॉससाठी 'Volume Eating' चा नवा ट्रेण्ड?

भरपूर खा आणि वजन उतरवा! तुम्हाला माहिती आहे का वेटलॉससाठी 'Volume Eating' चा नवा ट्रेण्ड?

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी पोटभर खा, असं सांगणारा हा नवा ट्रेण्ड नेमका आहे तरी कसा? (Volume Eating new trend for weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 09:10 AM2024-03-29T09:10:43+5:302024-03-29T09:15:01+5:30

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी पोटभर खा, असं सांगणारा हा नवा ट्रेण्ड नेमका आहे तरी कसा? (Volume Eating new trend for weight loss)

Volume Eating is the new trend for weight loss, how eating more helps you for weight loss, how to do weight loss? what is 'Volume Eating'? | भरपूर खा आणि वजन उतरवा! तुम्हाला माहिती आहे का वेटलॉससाठी 'Volume Eating' चा नवा ट्रेण्ड?

भरपूर खा आणि वजन उतरवा! तुम्हाला माहिती आहे का वेटलॉससाठी 'Volume Eating' चा नवा ट्रेण्ड?

Highlightsवजन तर कमी करायचं आहे, पण त्यासाठी उपाशी राहण्याची किंवा डाएटिंग करण्याची काही लोकांची अजिबातच तयारी नसते. त्या लोकांसाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरणारा आहे.

वजन कमी करायचं म्हणजे डाएट करायचं, उपाशी राहायचं, पोटभर जेवायचं नाही हे असं सगळं आपल्याला माहिती आहे. बरेचसे डाएट प्लॅनही तसेच सांगतात. पण आता मात्र या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध असणारा डाएट प्लान ट्रेण्डिंग आहे. यामध्ये पोटभर खा आणि वजन उतरवा असं सांगितलं आहे (how eating more helps you for weight loss). यालाच 'Volume Eating' असं म्हणून ओळखलं जातं. वजन तर कमी करायचं आहे, पण त्यासाठी उपाशी राहण्याची किंवा डाएटिंग करण्याची काही लोकांची अजिबातच तयारी नसते (how to do weight loss?). त्या लोकांसाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरणारा आहे. (Volume Eating is the new trend for weight loss)

'Volume Eating' म्हणजे नेमकं काय?

 

'Volume Eating' म्हणजे नेमकं काय याविषयी आहारतज्ज्ञ सुहानी जैन यांनी food.ndtv यांना माहिती दिली आहे. त्यानुसार या प्लॅनमध्ये तुम्ही काही पदार्थ पोटभर खाऊ शकता. जेणेकरून तुम्ही उपाशी राहणार नाही.

आलिया भट नेहमीच करते तिच्या आवडीचं 'हे' खास फेशियल, घरच्याघरी करायला एकदम सोपं

या प्लॅननुसार वेटलॉस करणाऱ्यांना high in volume but with a lower caloric value असे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजेच जे पदार्थ हेल्दी आहेत, जे खाल्ल्याने पोट लगेच भरल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात मात्र त्या पदार्थांमधून खूपच कमी कॅलरी मिळत असल्याने वजन वाढत नाही. 

 

आहारतज्ज्ञ रुपाली दत्ता यांनी food.ndtv यांना दिलेल्या माहितीनुसार 'Volume Eating' या डाएट प्लॅनमध्ये साधारणपणे सकाळी सलाड खाण्याचा सल्ला दिला जातो तर स्नॅक्समध्ये फळं खायला सांगितली जातात.

मेहेंदी- हेअर कलर न वापरता केसांना द्या चमकदार बरगंडी रंग, बीटरुट घेऊन करा उपाय....

तसेच जेवणामध्ये फायबर भरपूर असणारे पदार्थ, धान्य खायला सांगितलं जातं. पोळी किंवा भात यापेक्षा सूप, भाज्या आणि वरणाचं प्रमाण या आहारात जास्त असतं. यामुळे आहारात योग्य प्रमाणात कॅलरीज असल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. कोणताही पदार्थ केला तरी त्यात भरपूर भाज्या घालून कॅलरी बॅलेन्स करणं, हा या डाएट प्लॅनचा बेस आहे.

 

Web Title: Volume Eating is the new trend for weight loss, how eating more helps you for weight loss, how to do weight loss? what is 'Volume Eating'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.