Join us  

खूप चालता तरी शरीर जसंच्या तसंच? या ५ पद्धतीने चाला, भराभर वजन कमी होईल-मेंटेन दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:59 AM

Best Walking Exercises For Weight Loss : वॉकिंग लंजेज एक प्रकारचा इंटेस वर्कआऊट आहे. या पद्धतीने चाललल्याने गुडघ्यांचाही व्यायाम होतो.

वॉक करणं (Walk) आपल्या तब्येतीसाठी बरंच फायदेशीर मानललं जातं. चालल्याने तब्येतीच बरेच सकारात्मक बदल दिसून येतात. फिजिकल एक्टिव्हिटीज वाढतात. शरीर फ्लेक्सिबल राहत आणि वजनही नियंत्रणात राहते. हाडांवर सकारात्मक परिणाम होतो. (Walking Exercises For Weight Loss) वॉक प्रत्येकजण करू शकतो. महिला प्रेग्नंट असो किंवा वयस्कर व्यक्ती. जे लोक आजारी आहेत त्यांनी वॉक करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.  वॉकिंगच्या वेगवेगळ्या पद्धती वजन कमी करण्यास मदत करतात.  वॉकिंग व्यायामाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा. (5 Ways  Walk For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी कोणत्या पद्धतीने चालावे?

1) पॉवर वॉकिंग

पॉवर वॉकिंग व्यायाम हा खूपच सोपा व्याया आहे. वॉकिंग व्यायाम करताना आपल्या शरीराचे पोश्चर सरळ ठेवा. वॉक करताना हात पुढे-मागे हलवा. चालताना आधी टाच जमिनीला टेकवाववी नंतर संपूर्ण पाय ठेकवावा. या पद्धतीचे वॉकिंग तुम्ही वेगाने करू शकता ज्यामुळे शरीर एनर्जेटीक राहील आणि वजन कमी होण्यास मदत होईल. याशिवाय पॉवर वॉकिंग व्यायामानं हार्ट रेट वाढतो.  हृदयाच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते.

2) इंटरव्हल वॉकिंग

इंटरव्हल वॉकिंग म्हणजे  तुम्ही काही मिनिटांसाठी वेगाने चालता नंतर पुन्हा तुमचा स्पिड कमी करतात. इंटरव्हल वॉकिंग तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. या व्यायामाने फक्त हाडं मजबूत होत नाहीत तर सांध्यांच्या वेदनाही कमी होतात. मेटाबॉलिझ्म सुधारतो. इंटरव्हल व्यायामाने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. ज्यामुळे वजन कमी होतं. लोक ताण-तणावाने घेरलेले असतात त्यांच्यासाठी इंटरव्हल व्यायाम परिणामकारक आहे.

वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पोटभर चपाती खा-वजन भराभर घटेल; पाहा चपाती  खाण्याची योग्य पद्धत

3) वजन उचलून वॉक करणं

साधारणपणे एका ठिकाणी थांबून लोक वेट लिफ्टिंग करतात. यामुळे स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढते. वॉक करताना वजन उचलल्यास तुमची हेल्थ चांगली राहते. वॉकिंग विथ वेट्स करताना हातात डंबल किंवा जड सामान ठेवा. ज्यामुळे कॅलरीज बर्न होतील आणि मसल्स वाढतील.

4) स्पीड वॉक

स्पीड वॉकिंग म्हणजेच वेगानं चालणं. या वॉक दरम्यान तुम्ही ब्रेकही घेऊ शकत नाही. असं केल्याने स्टॅमिना अधिक वाढतो, हार्ट रेट वाढतो.  श्वसनसंस्थेसाठी हा चांगला व्यायाम आहे. यामुळे वेगाने  कॅलरीज बर्न होतात. स्पीड वॉकिंग अशा लोकांनी करावी जे वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत.

दिवसभरात भरपूर चालणं होतं तरी पोट सुटतंय? चालताना १ गोष्ट करा, भराभर घटेल वजन

5) वॉकिंग लंजेस

वॉकिंग लंजेज एक प्रकारचा इंटेस वर्कआऊट आहे. या पद्धतीने चाललल्याने गुडघ्यांचाही व्यायाम होतो. शरीराचा योग्य आकार येण्यासाठी आणि कोअर स्टेबल राहण्यासाठी उत्तम ठरते  ज्यामुले फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि वजन नियंत्रणात राहते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य