Join us  

जेवल्यानंतर तुम्हीही सवयीने हमखास करता 2 गोष्टी? म्हणूनच तर वजन वाढतंय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 6:56 PM

2 Mistakes for weight gain: तुम्ही डाएटींग करा अथवा नका करू, पण वजन वाढू द्यायचं नसेल तर जेवणानंतर लगेचच या काही चुका (avoid these 2 mistakes after every meal) करणं मात्र हमखास टाळा. 

ठळक मुद्देकोणत्या या दोन चुका ज्या सवयीने आपसूकच होऊन जातात आणि मग वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात?

काही जण डाएटिंग, व्यायाम असं सगळं नियमित करून वजन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. तर काही जणांना वजन वाढू न देण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते. त्यांची अंगकाठी त्यांना शिडशिडीत ठेवते. पण या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींकडून जर काही चुका झाल्या तर मात्र त्यांचं वजन हमखास वाढू शकतं. कोणत्या या दोन चुका ज्या सवयीने आपसूकच होऊन जातात आणि मग वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात?  (2 mistakes responsible for weight gain)

 

पहिली चूक१. जेवताना पाण्याचा ग्लास आपल्या शेजारी भरून ठेवलेलाच असतो. आता उन्हाळ्यात तर ग्लास पुरत नाही म्हणून तांब्याभरून पाणी आपण घेतलेलं असतं. जेवण करताना आणि जेवण झाल्यावर आपण भरपूर पाणी गटागटा पिऊन टाकतो. पोट भरलेलं जाणवतं तरी पाणी पितोच... हीच सवय नेमकी वजन वाढीसाठी मदत करते. जेवण करताना आणि जेवण झाल्यानंतर काही काळासाठी शक्यतो पाणी पिऊ नये. पाण्याचा ग्लास शेजारी भरून नक्की ठेवा. कंट्रोल झालं नाही तर अगदी एकेक घोट पाणी प्या. पण जेवताना आणि जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी पिऊ नका. यामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही आणि चयापचय क्रियेत अडथळे आल्याने शरीरावर चरबीचे थर जमा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने भरपूर पाणी प्या.

 

२. दुसरी चुकदुसरी चुक म्हणजे जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच झोपणे. आजकाल मोठ्या शहरात काम करणारे लोक ऑफिस संपवून घरी येतात तेव्हाच रात्रीचे ९- ९: ३० झालेले असतात. भरपूर भूकही लागलेली असते. अशावेळी मग घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण करेपर्यंतच झोपण्याची वेळ होते. दिवसभराचा थकवा आलेलाच असतो. त्यामुळे मग सुस्तीही येते. त्यामुळे नाईलाजाने अनेक जण जेवतात आणि झोपतात. ही सवयही वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यपाणीअन्न