Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं आहे ना? मग रात्री 'या' चुका कधीच करू नका..

वजन कमी करायचं आहे ना? मग रात्री 'या' चुका कधीच करू नका..

weight loss किंवा dieting करत असाल तर रात्रीच्या वेळी काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 06:34 PM2021-09-24T18:34:59+5:302021-09-24T18:35:53+5:30

weight loss किंवा dieting करत असाल तर रात्रीच्या वेळी काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे...

Want to lose weight? Then never make these mistakes at night. | वजन कमी करायचं आहे ना? मग रात्री 'या' चुका कधीच करू नका..

वजन कमी करायचं आहे ना? मग रात्री 'या' चुका कधीच करू नका..

Highlightsरात्रीच्या वेळी या काही गोष्टी करणे कटाक्षाने टाळा. मग बघा तुमचा डाएट किंवा वेटलॉस प्लॅन कसा वर्कआऊट होतो आणि वजन कसे कंट्रोल होते. 

वजन कमी करणे हा बहुतांश महिलांना सतावणारा प्रश्न. मग ती अगदी पंचविशीतली तरूणी असो किंवा चाळीशीतली स्त्री. तरूण मुली वजन वाढू नये, सध्या आहे तसे वजन व्यवस्थित मेंटेन रहावे म्हणून प्रयत्न करत असतात. तर पस्तिशी, चाळीशी आणि त्या आसपासच्या महिलांना वाढते वजन कंट्रोलमध्ये ठेवायचे असते. या दोन्ही गोष्टी करण्यासाठी मनावर आणि तोंडावर प्रचंड नियंत्रण ठेवावे लागते. आपण वजन कमी करण्यासाठी दिवसभर मेहनत घेतली आणि नेमकं रात्रीच्या वेळी जर काही चुका केल्या, तर मात्र आपले दिवसभराचे कष्ट पाण्यात जातात. म्हणूनच तर रात्रीच्या वेळी या काही गोष्टी करणे कटाक्षाने टाळा. मग बघा तुमचा डाएट किंवा वेटलॉस प्लॅन कसा वर्कआऊट होतो आणि वजन कसे कंट्रोल होते. 

 

रात्रीच्या वेळी 'या' गोष्टी करणे टाळा..
१. खूप जेवण करू नका.

रात्रीचा आहार नेहमी हलका असावा. त्यामुळे रात्रीच्या वेळी पचनास हलके असतील असेच पदार्थ खा आणि ते देखील एकदम पोटभर खाऊ नका. पोटात थोडी जागा रिकामी असतानाच जेवण संपवा. कारण जेवण केल्यानंतर काही तासांतच आपण झोपतो. अतिजेवण केले तर चयापयच क्रियेत अडथळा येतो आणि शरीरावर मेद साचायला सुरुवात होते. त्यामुळे रात्रीचे जेवण अतिशय मर्यादित असावे.

 

२. गोड पदार्थ अजिबात नको
रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळले पाहिजे. कारण या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या शारीरिक हालचाली कमी होतात. त्यामुळे गोड पदार्थांचे व्यवस्थित पचन होत नाही आणि शरीरात फॅट्स साचत जातात. 

 

३. थंडगार पाणी पिऊ नये
उन्हाळा असो अथवा पावसाळा. अनेक जणांना बारा महिने फ्रिजमधील थंडगार पाणी प्यायची सवय असते. अशी सवय आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. किमान रात्रीचे जेवण झाल्यावर तरी थंडगार पाणी किंवा जेवणासोबत थंडगार कोल्ड्रिंक पिणे टाळावे. असे केल्याने पचन संस्था आणि चयापयच क्रियेत अडथळा निर्माण होतो. म्हणूनच तर रात्रीच्यावेळी कोमट पाणी प्यावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. 

 

४. फळं खाऊ नका
जेवणानंतर लगेचच फळं खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. पण बरेच लोक जेवण केलं की लगेच वेगवेगळ्या फळांवर ताव मारतात. दोन जेवणांच्या मधला काळ जो असतो, तो फळं खाण्यासाठी उत्तम मानला जातो. जेवणानंतर जर फळं खाल्ली तर आपली पचन संस्था ना जेवणाचे व्यवस्थित पचन करु शकते, ना फळांचे. योग्य पचन झाले नाही, तर जेवण आणि फळे या दोघांचेही पोषण आपल्याला मिळत नाही. त्यामुळे जेवणानंतर फळं खाण्याची सवय लगेचच सोडून द्या.

 

५. जेवणानंतर लगेच झोपू नका
काही जण रात्रीचे जेवण खूप उशिरा करतात. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच त्यांना झोपावे लागते. ही सवय अतिशय चुकीची आहे. जेवल्यानंतर लगेचच कधीही झोपू नका. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये ३ तासांचे अंतर ठेवावे, असा सल्ला डॉक्टर देतात. आपण किमान २ तासांचे अंतर तरी पाळलेच पाहिजे. 
 

Web Title: Want to lose weight? Then never make these mistakes at night.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.